Share

‘आशा’ स्वयंसेविकांचे काम बंद आंदोलन, आरोग्य विभागाच्या कामावर परिणाम नाही

Published On: 

औरंगाबाद : योग्य मानधन, आरोग्य सुविधा, विमा योजना यासारख्या विविध सुविधा मिळाव्यात यासाठी मंगळवारपासून राज्यातील आशा वर्कर्सने संप पुकारला होता. त्यानुषंगाने औरंगाबाद जिल्ह्यातील हजार पेक्षा जास्त आशा सेविका संपावर गेल्या होत्या. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष सुरुच राहिल, असा निर्णय आशा वर्कर्सने घेतला आहे.

राज्य सरकार आशा कर्मचाऱ्यांबाबत गंभीर दखल घेत नाही. कोरोना काळात कामे करुनही त्यांना कमी मानधन दिले जात आहे. त्यामुळे राज्यभरातील ७० हजार पेक्षा जास्त आशा वर्कर आणि ४ हजार गट प्रवर्तक तर औरंगाबाद जिल्ह्यातील हजार पेक्षा जास्त आशा व प्रवर्तकानी संपाची हाक दिली आहे. या सर्वांनी एकत्रित येत हा संप करण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद मध्ये १८३३ आशा सेविका तर ९३ गटप्रवर्तक असून त्यापैकी जवळपास हजार पेक्षा जास्त सेविकांनी संप पुकारला होता. तर या संपामुळे काहीश्या प्रमाणात लसीकरणासाठी अडचण निर्माण झाली परंतु आशांना विशेष जबाबदारी नाही व कोविड संक्रमण कमी झाल्याने विशेष कामे खोळंबली नाही अशी माहिती जिल्हा समूह व्यवस्थापक जिल्हा परिषद यांनी दिली.

त्याचबरोबर आशाना जवळपास ७० ऍक्टिव्हिटी देण्यात आल्या आहेत त्यावर जसे काम केले जाईल तसे मानधन त्यांना मिळत आहे. त्याबरोबरच आशा सेविका ग्राम आरोग्य पोषण समितीच्या सचिव असून या समितीला मिळणाऱ्या निधीतून मास्क, सॅनिटायझर, ग्लोव्ह्ज आदी गरजेच्या वस्तू खरेदीसाठी मान्यता देण्यात आली आहे. सोबतच प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे १२ रुपये आणि प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेचा ३२० रुपयाचा विमा हप्ता शासन भरते अशी माहिती माहिती जिल्हा समूह व्यवस्थापक जिल्हा परिषद यांनी दिली.

या आहेत मागण्या

कोरोना काळात केंद्र सरकार 33 रुपयांप्रमाणे 1000 रुपये देते तेही वेळेवर नाही. त्यासाठी रोज 300 रुपये मानधन मिळावं.

आशा, गट प्रवतर्क महिलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात बेड राखीव असावेत.

आशांना मास्क, पीपीइ किट, ग्लोव्हज, सॅनिटाइजर पुरेशा प्रमाणात मिळत नाही, त्यामुळे सॅनिटायझर, मास्क यांसह सुरक्षेचे साधनं मिळावीत.

३ हजाराहून जास्त आशा कर्मचाऱ्यांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना कोरोना झाला मात्र सरकारकडून विमा किंवा आरोग्य सुविधा दिली जात नाही.

अनेक आशांचे आणि कुटुंबियांचे कोरोनात मृत्यू झाले, त्यांनाही सुविधा देण्यात आलेल्या नाही.
नियमानुसार ४ तास काम करणे अपेक्षित असताना १२ तास काम करावे लागते. कोरोनासाठी जवळपास सर्व प्रकारची सहाय्यता करावी लागते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!