औरंगाबाद : महापालिकेचे आयुक्तच स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे काम पाहत असतांना राज्य शासनाने स्मार्ट सिटीच्या सीईओ पदावर मुख्याधिकारी संवर्गातील बाबासाहेब मनोहरे यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीतून सुरू असलेल्या महापालिकेच्या कामावर परिणाम होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यात आता महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी मनोहरे यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांनी सदर नियुक्ती रद्द करण्याची मागणी नगरविकास खात्याकडे केली आहे.
कॉर्पोरेशनचे चेअरमन म्हणून शासनाने प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली व मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार महापालिका आयुक्तांकडे सोपविण्यात आला. त्यानुसार आतापर्यंत काम सुरू होते प्रत्येक आयुक्तांनी स्मार्ट सिटी योजनेत महापालिकेच्या कामांना झुकते माप दिले. महापालिकेच्या आर्थिक अडचणीमुळे जी कामे होऊ शकली नाहीत. ती कामे स्मार्ट सिटी योजनेत घेण्यात आली. असे असतांनाच नगरविकास खात्याने औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या सीईओपदी मुख्याधिकारी संवर्गातील बाबासाहेब मनोहरे यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत.
त्यामुळे महापालिका व स्मार्ट सिटीचे कामकाज वेगवेगळे होणार आहे. यासंदर्भात पांडेय यांनी आक्षेप नोंदविला असून ही नियुक्ती रद्द करण्याची लेखी मागणी त्यांनी नगर विकास विभागाकडे केली आहे. नगर विकास खात्याचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्याकडे याबाबतचे पत्र पाठविले असल्याचे सूत्रांनी सांगितले. सीईओपदी महापालिकेचे आयुक्त कार्यरत असल्याने शहरातील विकासकामांना गती मिळाली आहे. पांडेय यांनी शहरात विकास कामांचा धडाका सुरु केला आहे. विशेष म्हणजे स्मार्ट सिटीतील त्यांची कामे उल्लेखनीय आहेत.
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींच्या ‘त्या’ प्रश्नावर भाजपने काढला राहुल यांचा खापर पणजोबा!
- सेलेब्रेटींचं ‘Tweet Together’; शेतकरी आंदोलनासंबंधित सायना नेहवालनं अक्षय कुमारचं ट्विट केलं कॉपी
- ट्रॅक्टर रॅलीत दगावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रियंका गांधी रवाना
- ‘मी शेतकऱ्याची लेक, बळीराजाला पाठिंबा देण्यासाठी आज गाझीपूर सीमेवर जाणार’
- ‘ट्वीट करण्याआधी दिल्लीत जाऊन शेतकऱ्यांची परीस्थिती बघा’ संजय राऊतांचा सेलिब्रिटींना टोला

