Share

शेतकरी कायद्याविरोधातील आंदोलनावर नक्कीच तोडगा निघेल : तावडे

Published On: 

मुंबई : केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 13 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन  करणाऱ्या  शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही.

9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी आज पुकारलेल्या ‘भारत बंद’ला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे.भारत बंदमध्ये सहभागी होण्यासाठी कोणालाही बंदी नाही. सर्वांना सांकेतिक बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी केलं.

दरम्यान, केंद्र सरकार संवेदनशील असून ते शेतकऱ्यांशी संवाद साधायला तयार आहे. त्यामुळे शेतकरी कायद्याविरोधातील आंदोलनातून नक्कीच तोडगा निघेल, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय चिटणीस विनोद तावडे यांनी काल रत्नागिरीत व्यक्त केला. तावडे यांची राष्ट्रीय चिटणीसपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा रत्नागिरीत भाजपतर्फे सत्कार करण्यात आला. त्यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दरम्यान,आजच्या ‘भारत बंद’वर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टीकास्त्र सोडले आहे. या शेतकरी विधेयकामुळे बाजार समित्यात रुमाल टाकून सौदे करणाऱ्या दलाल आडत्यांना शेतकऱ्यांना फसवतां येणार नाही म्हणून आज या दलालाची बाजू घेत शेतकरी विरोधी बंद सुरू आहे असं त्यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!