पुणे – संपूर्ण देशावर सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट आहे. सर्वसामान्य जनतेने कोरोनाच्या धोक्यापासून वाचण्यासाठी सरकारने घातलेले नियम स्वीकारले यामुळे अनेक संकटाना देखील जनतेला सामोरे जावे लागले असल्याचे पहायला मिळाले. सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारधील नेते, मंत्री त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोरोना काळात काळजी घेण्याचे आवाहन जनतेला करत आहेत.
तिसऱ्या लाटेच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. म्हणून राज्य सरकार तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उपाय योजना करत आहेत. तर, दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि महत्वाचे नेतेच कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन कराताना दिसत आहेत.
महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार रविवारी पहिल्यांदाच जुन्नर-आंबेगाव दौऱ्यावर आले होते. पवारांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्याला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचीही उपस्थिती होती. मात्र, कार्यक्रमाला कोरोनाचे नियम पायदळी तुडवत लोकांनीही तुफान गर्दी केली होती.
याशिवाय पुणे जिल्ह्यातील मंचर येथे स्वर्गीय खासदार किसनराव बाणखेले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळीही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तसेच दोन दिवस आधी याच तालुक्यात आळे फाटा पोलिसांच्या हद्दीत शिवसेना खासदार संजय राऊत आले होते. तिथं झालेल्या कार्यकर्त्या मेळाव्यात अशीच गर्दी उसळली होती.
सामान्यांना निर्बंध आणि नेत्यांना कायद्यातून सूट अशी बातमी माध्यमांनी दाखवली त्यानंतर पोलिसांना जाग आलेली आहे. याप्रकरणी आता जुन्नर, मंचर आणि आळेफाटा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, फक्त कार्यकर्ते किंवा छोट्या मोठ्या नेत्यांवर गुन्हे न नोंदवता कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या बड्या नेत्यांच्या विरोधात देखील गुन्हे दाखल करावेत अशी मागणी सध्या सर्व बाजूंनी जोर धरत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मनी हाईस्ट’मधील ‘या’ भूमिकेत पंकज त्रिपाठीला पाहून चाहते भडकले
- ‘गरीबांची मुले शिकली, मोठी झाली, उच्च विद्या विभूषित झाली तरच त्यांचे जीवनमान उंचावेल’
- बिंदूसरासह माजलगाव धरण शंभर टक्के भरले, ११ दरवाजे उघडले
- अजिंक्य रहाणे शून्यावर बाद; नेटकरी म्हणाले, ‘जारवोप्रमाणे रहाणेला ओढून बाहेर काढा’
- खेड : तरसाचा दोघांवर हल्ला, तरुणाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे वृद्धाचा जीव वाचला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

