Share

महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष नोव्हेंबर मध्ये होणार सुरु

Published On: 

मुंबई : कोरोना यारोगाच्या महामारी मुळे गेले ३ महिने महाराष्ट्र राज्यासह देशभरात लॉकडाऊन केले गेले होते. आता संपूर्ण देशासह महाराष्ट्रात हळू हळू जनजीवन सुरळीत होत असले तरी कोरोना बधितांचा वाढता आकडा व अजून उपलब्ध न झालेली लस हि चिंतेची बाब आहे.

उद्योग- व्यवसाय जरी या मिशन बिगीन अगेन मध्ये सुरु करण्यात येत असले तरी शाळा, महाविद्यालये व विद्यापीठे पूर्ववत करणे हे अद्याप सुरक्षित नाही.मनुष्यबळ विकास मंत्रालय व युजीसीच्या बैठकीत महाविद्यालयांच्या शैक्षणिक वर्षांबद्दल महत्वाचे निर्णय घेण्यात आले. विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष हे येत्या नोव्हेंबर पासून सुरु करावे, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक झाली. तसेच, विद्यापीठांमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत अंतिम वर्षांच्या परीक्षा पूर्ण करून ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर पर्यंत निकाल जाहीर करावेत, अशी अपेक्षा करण्यात आली आहे.

त्यानुसार सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयामध्ये नोव्हेंबरमध्ये शैक्षणिक सत्र सुरु होईल, असेही बैठकीत सांगण्यात आले. दरम्यान, राज्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन शिक्षण पद्धतीची सुरुवात झाली असून अनेक विद्यार्थी हे या शिक्षणापासून वंचित राहत आहेत.

त्यामुळे शैक्षणिक दर्जा घसरण्याची शक्यता असतानाच ज्या विद्यार्थ्यांकडे इंटरनेट, चांगला मोबाईल, यासोबतच गावाकडील विजेचा लपंडाव त्यामुळे चार्जिंग ची समस्या, नेटवर्क या व अशा अनेक समस्या उद्भवत असतील तर त्यात त्यांची काय चुक! त्यांच्याकडे होत असलेले दुर्लक्ष मात्र त्यांच्या चिंतेत भर घालत आहे.

शिवभोजन थाळीचा दर पुढील 3 महिन्यांसाठी पाच रुपये, ठाकरे सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

‘बाळासाहेब ठाकरेंच्या कामाची पद्धत भाजपाच्या विचारधारेशी सुसंगत होती असं मला कधीच वाटलं नाही’

इंदुरीकर महाराजांसाठी भाजपचा ‘हा’ बडा नेता उतरणार रस्त्यावर

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!