🕒 1 min read
मुंबई : विधानसभा 2019 नंतर राज्यात वेगळ्यापद्धतीचं राजकारण अनुभवायला मिळालं. महाराष्ट्रात पहिल्यांदा महाविकास आघाडीच्या रुपात राज्यातील जनता सत्ताकारण अनुभवत आहे. मात्र अधूनमधून या सत्ताकारणात काहींना काही वादळं निर्माण होताना पाहायला मिळतात. शिवसेना संसदीय नेते आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे. संजय राऊत यांनीच याबाबत ट्वीटरवरुन याची माहिती दिलीय. येत्या शनिवार पासून 3 भागांत ही रंगलेली रोखठोक मुलाखत प्रसिद्ध होणार आहे.
संजय राऊत यांनी ट्विटर वरून या मुलाखतीचा टिझर समोर आणला असून या मुलाखतीला ‘एक शरद…सगळे गारद’! अस नावं दिल आहे. त्यामुळे या मुलाखातीकडे संपूर्ण देशातील राजकीय विश्वाचे लक्ष लागले आहे. आज या मुलाखतीचा दुसरा टिझर संजय राऊतांनी ट्विटवरुन प्रसिद्ध केला आहे. यात ठाकरे सरकारचे तुम्ही रिमोट कंट्रोल आहात की हेडमास्टर असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे यावर मुलाखतीत शरद पवार काय उत्तर देतात हे जाणण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
शिवभोजन थाळीचा दर पुढील 3 महिन्यांसाठी पाच रुपये, ठाकरे सरकारचा ऐतिहासिक निर्णय !
ठाकरे सरकारचे आपण रिमोट कंट्रोल आहात की हेडमास्तर?
काय म्हणतात शरद पवार? pic.twitter.com/ot0Y8pdJ0X— Sanjay Raut (@rautsanjay61) July 9, 2020
पण यात काही मुद्द्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, भाजपाचा जो १०५ आकडा आहे त्यात शिवसेनेचं पण योगदान होतं, मला जे बाळासाहेब ठाकरे माहिती आहेत, बाळासाहेबांची विचारधारा, कामाची पद्धत भाजपाच्या विचारधारेशी सुसंगत होती असं मला कधीच वाटलं नाही, तीन विचारांचे तीन पक्ष असले तरी पण सगळेजण एका विचाराने मुख्यमंत्र्यांच्या धोरणाच्या पाठीमागे आहेत असं शरद पवारांनी सांगितले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
