Share

इंदुरीकर महाराजांसाठी भाजपचा ‘हा’ बडा नेता उतरणार रस्त्यावर

Published On: 

🕒 1 min read

अकोले : पुत्र प्राप्तीसाठी सम-विषम फॉर्म्युला सांगणाऱ्या प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात pcpndt कायद्यानुसार संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाची पहिली सुनावणी आज झाली आहे. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं होत. आता इंदुरीकर महाराजांना आपलं म्हणणं मांडण्याची संधी देण्यात आली आहे. येत्या 7 ऑगस्टला इंदुरीकर महाराजांना कोर्टात हजर राहण्याचे समन्स संगमनेर कोर्टाने बजावले आहे.

या प्रकरणात ज्यांनी तक्रार दाखल केली होती त्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकारी रंजना गवांदे यांनी राजकीय दबावामुळे गुन्हा दाखल केला जात नव्हता, असा आरोप केलाय. इंदोरीकर महाराज यांचे वक्तव्य महिलांसाठी अन्यायकारक आणि कायद्याविरोधात असल्याने तक्रार दाखल केल्याचा त्यांचा दावा आहे.

दरम्यान, निवृत्तीमहाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्यावर गु्न्हे दाखल होऊ नये म्हणून यापूर्वी अनेक राजकारणी पुढे आले होते. अखेर गुन्हा दाखल झाला. आता हा गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी करीत भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य वैभव पिचड यांनी रस्त्यावर येण्याची तयारी केली आहे. एव्हढेच नव्हे, वारकरी आंदोलन करतील आणि आपण त्यात अग्रभागी राहू, असेही त्यांनी म्हटले आहे.

अकोलेचे तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवेदन देवून त्यांनी त्यात इशारा दिला आहे. गुन्हे मागे घेतले नाही, तर वारकरी आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे. या वेळी दीपक देशमुख महाराज, भाजपचे तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे, तालुका सरचिटणीस भाऊसाहेब वाघचौरे आदी नेतेही उपस्थित होते.

‘बाळासाहेब ठाकरेंच्या कामाची पद्धत भाजपाच्या विचारधारेशी सुसंगत होती असं मला कधीच वाटलं नाही’

निवृत्ती महाराज देशमुख हे राज्यातील उत्तम प्रबोधनकार आहेत. अनेकांचे उद्धवस्त झालेले संसार त्यांच्या प्रबोधनामुळे सुरळीत झाले आहेत. गेली २५ वर्षे कीर्तनातून ते लोकांचे प्रबोधन करीत आहेत. त्यांच्या प्रबोधनाचा अनेक लोकांना फायदा झालेला आहे. त्यांच्या प्रबोधनामध्ये ग्रंथ पुराणाचा संदर्भ असतो. त्याच अनुषंगाने त्यांनी सम विषम तारखेबद्दल आपले प्रबोधन केलेले आहे. त्यांचा त्यामागे समाजात कोणताही अपप्रचार करण्याचा हेतू नव्हता व नसेल. त्यांचे सामाजिक कार्य सर्व राज्यात सर्वश्रुत आहे. त्यांना राज्यात अनेक नामांकीत पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. त्यांची वाढती सवंग लोकप्रियता ही त्यांच्या विरोधकांना खपत नाही त्यामुळे त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांची मानसिकता खराब करण्याचे काम चालू आहे. या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करीत आहे. अस वैभव पिचड म्हणाले आहेत

इंदोरीकर यांच्यावरील गुन्हे मागे घेऊन समाजात भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करणाऱ्या साधुसंतांना त्रास देऊ नये. इंदोरीकर महाराज हे अकोलेचे भूमिपुत्र असल्याने जर हे खोटे गुन्हे मागे घेतले नाही, तर राज्यभर वारकरी आंदोलन उभारतील. त्यामध्ये आम्ही भूमिपुत्र म्हणून सर्वात अग्रभागी राहू, असेही पिचड यांनी म्हटले आहे.

शिवभोजन थाळीचा दर पुढील 3 महिन्यांसाठी पाच रुपये, ठाकरे सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!