Share

शिवभोजन थाळीचा दर पुढील 3 महिन्यांसाठी पाच रुपये, ठाकरे सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवभोजन थाळीचा दर पुढील 3 महिन्यांसाठी पाच रुपये एवढा करण्याबाबत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मजूर, स्थलांतरीत, बेघर तसेच बाहेरगांवचे विद्यार्थी इ. लोकांच्या जेवणांअभावी हाल-अपेष्टा होत असल्याने शिवभोजन थाळीची किंमत 30 मार्चपासून तीन महिन्यांच्या कालावधीसाठी दहा रुपयाऐवजी पाच रुपये एवढी निश्चित करण्यात आली होती. ही मुदत त्यापुढील तीन महिन्यांच्या कालावधीसाठी वाढविण्यात आली असून 6 कोटी रुपये एवढ्या वाढीव खर्चासही मान्यता देण्यात आली.

सध्या जिल्हा स्तरावर ही शिवभोजन केंद्रे चालवली जातात. आता तालुका स्तरावर सुरू होतील. पुढील तीन महिन्यांसाठी शिवभोजनाच्या प्रती थाळीचा दर पाच रुपये इतका करण्यात आला आहे. शिवभोजन थाळीची किंमत शहरी भागात ५० रुपये प्रती थाळी असून, ग्रामीण भागात ३५ रुपये इतकी आहे.

धनंजय मुंडेंचा मोठा निर्णय, ‘त्या’ विद्यार्थ्यांनाही मिळणार फेलोशिप

प्रत्येक ग्राहकाकडून मिळालेल्या ५ रुपयांव्यतिरिक्त उर्वरित रक्कम शहरी भागात प्रती थाळी ४५ रुपये आणि ग्रामीण भागात प्रती थाळी ३० रुपये असे अनुदान संबंधित केंद्र चालकाला देण्यात येईल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. ही भोजनालये सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत सुरू राहतील. या शिवभोजन केंद्र चालकांना देखील करोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता ठेवणे, निर्जंतुकीकरण करून घेणे, कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुणे तसेच मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

‘साहेब आतापर्यंत या गावात कोणताच मंत्री आला नाही’, प्राजक्त तनपुरेंच्या अचानक भेटीने गावकरी गहिवरले !

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!