औरंगाबाद : जगभरात सर्वत्र कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणच्या धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तरी काही ठिकाणी उपाययोजना आखून नियम व अटीसह परवानगी देण्यात आली आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हज यात्रा रद्द करण्यात आली होती. यंदा २०२१ च्या यात्रेस काही नियमांसह सौदी अरेबिया आणि भारत सरकारने परवानगी दिली आहे.
सौदीच्या नियमांनूसार, जून महिन्यात हजला जाणाऱ्या भाविकांना कोरोनाचे दोन्हीही लस घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसे पत्र सौदी अरेबियाच्या आरोग्य मंत्रालयाने केंद्र सरकारला पाठवले आहे. भारतातून दरवर्षी अनेक मुस्लीम भाविक हज यात्रेला जातात. या वर्षीच्या हज यात्रेसाठी ज्यांनी अर्ज केले आहेत, त्यांना कोरोनाच्या दोन्ही लसी घेणे बंधनकारक आहे.
लस घेतली असेल तरच यात्रा करण्यास परवानगी मिळेल, असे पत्र सौदी अरेबियाचे आरोग्य मंत्रालय व वाणिज्य दूतावासाने हज कमिटी ऑॅफ इंडियाला पाठवले आहे. पहिला डोस एप्रिल महिन्यात, तर दुसरा प्रवासाच्या आधी घ्यावा. लस न घेतल्यास प्रवास करता येणार नाही. त्यामुळे यात्रेकरूंनी तातडीने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन हज कमिटी ऑफ इंडिया व महाराष्ट्र हज कमिटीने केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘भाऊ, ‘तो’ हक्क फक्त तुम्हालाच आहे!’, पंकजांचा धनंजय मुंडेंवर पलटवार
- संजय राऊतांचे ‘ते’ वक्तव्य कंपाउंडरने घेतले मनावर, डॉक्टर बनून केले कोरोना रुग्णांवर उपचार
- ‘आम्ही अजित पवारांना मुत्र्या म्हणालो तर राष्ट्रवादी वाल्यांना ते आवडणार नाही’
- ‘महाराष्ट्र देशा’चा इम्पॅक्ट! बातमी प्रकाशित होताच बीडच्या खा.प्रितम मुंडेनी घेतला कोरोनाचा आढावा
- मोदींनी नक्की कोणाचं ऐकलं ? ठाकरे बंधू आमने-सामने !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

