🕒 1 min read
नाशिक: नाशिक येथे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा समारोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी संत साहित्य, चळवळ तसेच विविध कालखंडातील समतेच्या लढ्यांचे संदर्भ देत त्याचा आढावा घेतला. स्वातंत्र्य चळवळ, आणिबाणी याबाबत त्यांनी विविध प्रसंगांचे संदर्भ सांगितले.
बाळासाहेब थोरात म्हणाले, स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सुद्धा लोकमान्य टिळकांनी पुन्हा स्वातंत्र्याची ज्योत पेटवली ती त्यांच्या लिखानातून पेटवली हे आपल्याला विसरता येणार नाही. महात्मा गांधींनी सुध्दा आपल्या लिखानातून स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा दिली. आपल्या राज्यघटनेमध्ये नेमके काय उतरलं तर त्या सगळ्या संतांच्या, त्या चळवळींचा सार, परंपरा आपल्या राज्यघटनेत आल्या आणि आपल्या राज्यघटनेत आपल्याला भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकरांच्या रुपाने असा काही किमयागार मिळाला की, आपण राज्यघटनेचे प्रीअँबल जरी वाचले तरी कळते की, आपली संस्कृती काय, आपले विचार काय, ते वेगळे नाही हे सांगणारं किमयागार बाबासाहेबांच्या रुपाने आपल्या सगळ्यांना मिळाला.
स्वातंत्र्य चळवळीचा हा इतिहास कोणी पुसू शकत नाही. परंतु कोणी तरी एक बाई उठते आणि स्वातंत्र्य चळवळीवर आघात करते. स्वातंत्र्य म्हणजे मिळालेली भिक म्हणते. खरं म्हणजे त्यापेक्षाही वाईट वाटणारी गोष्ट अशी आहे की, महाराष्ट्रातील एक बुजुर्ग उठतो आणि तो तीला पाठींबा देतो, असं म्हणत बाळासाहेब थोरातांनी कंगना रानौत (Kangana Ranaut) आणि अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- महापरिनिर्वाण दिनानिमित्त छगन भुजबळांचे डॉ. बाबासाहेबांना अभिवादन
- कारण नसतांना विरोध करणे म्हणजे कोल्ह्याला द्राक्ष आंबट; भुजबळांचा फडणवीसांना टोला
- चिंताजनक! राज्यात नव्या व्हेरिएंटने बाधित रुग्णसंख्या ८ वर
- ‘भीतीच्या सावटाखाली जगणाऱ्या लेखण्या म्हणजे शेळ्या-मेंढ्यांच्या शेपटा’
- रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आजपासून भारत दौऱ्यावर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
