नाशिक : आडगाव येथील कविवर्य कुसुमाग्रजनगरीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप करण्यात आला. यावेळी साहित्य संमेलनात स्वागताध्यक्ष म्हणून मंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांना कुसुमाग्रज यांच्या नावाला विरोध करण्यावरून चांगलाच टोला लगावला आहे.
साहित्यिक कार्यक्रमातून सावरकरांचे नाव ‘गहाळ’ असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. नाशिक हे स्वातंत्र्यसैनिकांचे जन्मस्थान आणि कार्यस्थळ आहे. मराठी साहित्य संमेलन, मराठी नाट्य संमेलन आणि मराठी पत्रकार संघाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे. आणि बहुधा हे तिन्ही सन्मान त्यांनाच मिळाले. ज्या कुसुमाग्रजांच्या नावावरून या स्थळाला नाव देण्यात आले, त्या कुसुमाग्रजांचा आम्ही आदर करतो. पण जिथे आपल्या आदर्शांचा अपमान केला जातो, तिथे जाऊन काय करायचे? असा सवाल करत फडणवीस यांनी संमेलनावर बहिष्कार टाकला. याचाच समाचार मंत्री छगन भुजबळ यांनी घेतला.
आवश्यक असल्याचे न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी सांगितले.सभामंडपाला #कुसुमाग्रजनगरी नाव देण्याचे अगोदरच ठरले होते. मग त्यांच्या नावाला विरोध का ? स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमच्यासाठी आदर्श आहे.संमेलनात त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला तरी देखील आमच्या आदर्शचा अपमान झाला असा pic.twitter.com/lplCTdpnUc
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) December 5, 2021
सभामंडपाला कुसुमाग्रजनगरी नाव देण्याचे अगोदरच ठरले होते. मग त्यांच्या नावाला विरोध का? स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमच्यासाठी आदर्श आहे.संमेलनात त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला तरी देखील आमच्या आदर्शचा अपमान झाला असा विरोध केला गेला. हे अतिशय चुकीचे आहे. कारण नसतांना देखील विरोध करणे म्हणजे कोल्ह्याला द्राक्ष आंबट असे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी केले. तसेच नाशिकची द्राक्ष आंबट नाही त्यात आता शरद सीडलेस तर खूपच गोड आहे. असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे. हे संमेलन अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न आपण केला. नव्या तंत्रज्ञानाने हे साहित्य संमेलन जगभरात जाऊन पोहचले असल्याचेही भुजबळ यांनी म्हटले आहे. दरम्यान साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ढाले पाटील यांनी संमेलनाचे कौतुक करत पुढील ९५ वे संमेलन उदगीर येथे होईल असे जाहीर केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ममता बॅनर्जी आल्या व महाराष्ट्रात वादळ निर्माण करून गेल्या- संजय राऊत
- शाई फेक करणं पूर्णपणे चूकीचं; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
- अशा घटना महाराष्ट्राला शोभत नाहीत; शाई फेकीवर शरद पवारांची प्रतिक्रिया
- कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे; गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकीचा राऊतांकडून निषेध
- …पण ती संभाजी ब्रिगेडची उत्सफूर्त प्रतिक्रिया; दरेकारांचं शाईफेकला समर्थन

