Share

महापरिनिर्वाण दिनानिमित्त छगन भुजबळांचे डॉ. बाबासाहेबांना अभिवादन

Published On: 

मुंबई : आज ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६५ वा महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvan Din). त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. राज्यभरातून महामानवाला वंदन केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

याबाबत छगन भुजबळ यांनी ट्विट केले आहे. भुजबळ ट्विटमध्ये म्हणतात, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानसूर्य, महामानव, भारतरत्न, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. यावेळी माजी आमदार पंकज भुजबळ उपस्थित होते.

बाबासाहेबांनी एकता, समता, बंधुता, सर्वधर्मसमभावाचा विचार आपल्याला दिला. त्यांचे हे विचार देशाला एकसंघ ठेवण्यास आणि समाजाला पुढे घेऊन जाणार आहे. बाबासाहेबांच्या विचारांची अंमलबजावणी करून त्यांनी देशाला दिलेल्या राज्यघटनेचे संरक्षण आपण सर्वांनी करूया. असे छगन भुजबळ म्हणाले.

दरम्यान, आज सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख, सामाजिक न्यायमंत्र धनंजय मुंडे यांनी चैत्यभूमीवर अभिवादन केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमीवर महापालिकेकडून कोरोना चाचणी आणि लसीकरणाचीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!