Share

‘…म्हणूनच १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले’; चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरु असल्याचं पाहायला मिळालं. दोन दिवसांच्या अधिवेशनात देखील अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळत असून काही काळ सभागृहाचे कामकाज देखील तहकूब करण्यात आले होते. तर, या गोंधळानंतर असंसदीय शब्द वापरत धक्काबुक्की केल्याचा आरोप करत तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी १२ आमदारांच्या निलंबनाला मान्यता दिली.

दरम्यान, १२ आमदारांच्या निलंबनानंतर भाजपच्या विविध नेत्यांनी याचा निषेध केला आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. महाविकास आघाडी सरकारने जनतेची केलेली फसवणूक आम्ही समोर आणू या भीतीनेच आमच्या १२ आमदारांवर कारवाई केली गेल्याच पाटील म्हणाले आहेत.

‘महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रातील प्रत्येक समाजघटकाची फसवणूक करत आहे. ही फसवणूक आम्ही उघड पाडू या भितीतूनच खोटे आरोप रचून आमच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. ही लोकशाहीची गळचेपी असून या निलंबनाचा मी निषेध करतो.जनतेच्या हितासाठी आम्ही शेवटपर्यंत संघर्ष करतच राहू!,’ असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

नेमका गोंधळ काय ?

ओबीसी आरक्षणासाठीच्या इम्पिरीकल डाटा केंद्राकडून मिळावा यासंदर्भात एक प्रस्ताव आज मंत्री छगन भुजबळ यांनी मांडल्यानंतर तो सभागृहात मंजूर करण्यात आला. मात्र, हा ठराव मांडण्यात आल्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या दालनात येऊन जोरदार घोषणाबाजी केली. तसेच अध्यक्षांचा माईकही ओढला. यावेळी धक्काबुक्की देखील झाली. तर, तालिका अध्यक्षांना शिवीगाळ केल्याचा आरोप देखील ठेवण्यात आला आहे.

भाजपच्या डझनभर आमदारांचे निलंबन –

याच पार्श्वभूमीवर संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी भाजपच्या १२ आमदारांवर कारवाई म्हणून १ वर्षासाठी निलंबित करण्याचा ठराव मांडला होता. हा ठराव आवाजी मतदानाने सभागृहात मंजूर करण्यात आला आहे. या निलंबनानंतर भाजप नेते कामकाजावर बहिष्कार टाकत सभागृहातून बाहेर आले. गिरीश महाजन, आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत, किर्तीकुमार बागडीया या आमदारांचा समावेश आहे. या आमदारांना पुढील एक वर्षासाठी विधानसभेच्या मुंबई किंवा नागपूरच्या एकाही कामकाज सहभाग घेता येणार नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!