🕒 1 min read
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी ५ वाजता जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लसीकरणाबाबत महत्वाच्या घोषणा केल्या. २१ जूनपासून १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस मोफत देणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यासोबतच, लसीकरणाची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकार घेत असल्याचे सांगितले.
दरम्यान, अनेक राज्यांमध्ये लसींचा तुटवडा असून संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी लसीकरण वेगाने होण्याची आवश्यकता आहे. मात्र, नागरिक उत्साही असताना लसींचा मुबलक साठा नसल्याने हिरमोड होत आहे. यावरून तीव्र नाराजी होत असून विरोधकांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. यासोबतच, सर्वोच्च न्यायालयानेही केंद्र सरकारला लसीकरणाच्या धोरणावरून सुनावलं होतं.
याच पार्श्वभूमीवर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे. पंतप्रधानांच्या या घोषणेनंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. याबाबत सिसोदिया यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर, ‘आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आभार व्यक्त करतो कारण सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतरच देशातील सर्व वयोगटांतील नागरिकांना मोफत लस उपलब्ध होणार आहे.’ असा संदेश पोस्ट केला आहे.
हम माननीय सुप्रीम कोर्ट का आभार व्यक्त करते हैं कि उनके दख़ल के बाद देश भर में हर उम्र हर वर्ग के लोगों को मुफ़्त वैक्सीन उपलब्ध होगी.
केंद्र सरकार चाहती तो बहुत पहले यह कर सकती थी लेकिन केंद्र की नीतियों के चलते न राज्य वैक्सीन ख़रीद पा रहे थे और न केंद्र सरकार दे रही थी.
— Manish Sisodia (@msisodia) June 7, 2021
‘जर केंद्र सरकारची इच्छा असती तर त्यांना हा निर्णय फार पूर्वीच घेता आला असता. मात्र केंद्राच्या नियमांमुळे ना तर राज्य लसी खरेदी करू शकत होते ना केंद्र सरकार लसी देत होतं.’ असा आरोपही सिसोदिया यांनी ट्विटद्वारे केंद्र सरकारवर लगावला. दरम्यान यावेळी मोदींनी लहान मुलांच्या आरोग्यावर चिंता व्यक्त केली. लहान मुलांनाही लस मिळाली पाहिजे. त्यासाठी दोन लसींवर काम सुरू आहे. त्यात लवकरच यश मिळेल, अशी आशाही मोदींनी व्यक्त केली. देशात 7 कंपन्या लसनिर्मिती करत आहेत. 3 आणखी लसींची ट्रायल सुरु आहे. लसीची उपलब्धता वाढवण्यासाठी अन्य कंपन्यांशी संपर्क सुरू आहे, असंही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘…त्याआधीच मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या भेटीला निघालेत ही गोष्ट आकलनापलीकडची’
- …म्हणून मोदींनी लसीकरणाच्या जबाबदारीची घोषणा केली; नवाब मलिकांचा दावा
- कापसाची लागवड १५ जूननंतरच करा! कृषी विभागाचे आवाहन
- आता लहान मुलांनाही कोरोना लस मिळणार ; मोदींनी सांगितला ‘हा’ प्लान
- रेल्वेकडे प्रवाशांची पाठ; अनलॉकमध्येही आजपासून ‘या’ रेल्वे रद्द!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
