🕒 1 min read
सिंधुदुर्ग – मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कानशिलात लगावण्याची भाषा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे पडसाद पडताना पाहायला मिळाले. विशेष म्हणजे या प्रकरणात राणेंना अटक सुद्धा झाली होती. यानंतर शिवसेना आणि भाजपमधील वाद दिवसेंदिवस आता चिघळत चालल्याचे दिसत आहे.
हा वाद फक्त पक्षीय वाद किंवा वैचारिक वाद न राहता आता व्यक्तिगत पातळीवर देखील येऊन पोहचला आहे. सामनामधून राणे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर जोरदार हल्ला चढवण्यात आला आहे. सामनातील रोखठोक या सदरात खा. संजय राऊत म्हणतात, राणे यांच्या राजकीय कारकीर्दीचे सगळय़ात जास्त नुकसान त्यांच्या मुलांनी केले आहे. टीका करणे व स्वीकारणे ही लोकशाहीची परंपरा आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे, पण ठाकऱ्यांपासून पवारांपर्यंत, राहुल गांधींपासून मोदींपर्यंत सगळय़ांचे ‘आईबाप’ काढणाऱ्या राणेंच्या मुलांनी त्यांच्या पिताश्रींचे नुकसान केले.
एक दिवस हीच वेळ ते फडणवीस, चंद्रकांत पाटलांवर आणतील. हे राजकारण खरे नाही, असे फडणवीसांनी एकदा राणे यांना समोर बसवून समजावून सांगायला हवे. कारण फडणवीस यांचा उल्लेख राणे यांनी ‘मार्गदर्शक’ म्हणून केला आहे. राणे यांची मुले इतरांचे बाप ऊठसूट जाहीरपणे काढतात. तुम्ही बिनबापाचे आहात काय?’’ असा प्रश्न त्यांना एक दिवस भारतीय जनता पक्षाचे लोकच विचारतील तेव्हा ते काय उत्तर देतील? असा सवाल सामनामधून विचारण्यात आला होता.
दुसऱ्यांच्या मुलांबद्दल बोलण्या पेक्षा..
राऊत नी..
डॉ महिला च्या मुलाशी आपले संबंध काय ??
तिचा बाप कोण?
रोख ठोक उत्तर द्या !!!— Nitesh Rane (@NiteshNRane) August 29, 2021
या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी एक ट्वीट करून खळबळ उडवून दिली आहे. दुसऱ्यांच्या मुलांबद्दल बोलण्यापेक्षा.. राऊत नी.. डॉ महिलाच्या मुलाशी आपले संबंध काय ?? तिचा बाप कोण? रोख ठोक उत्तर द्या !!! असा खळबळजनक सवाल करत नितेश राणे यांनी उपस्थित केले आहेत.
दरम्यान, आता जे ट्वीट राणे यांच्या टाईमलाईनवर दिसत आहे त्याआधी राणेंनी एक ट्वीट केले होते या ट्वीट मध्ये त्यांनी डॉ. पाटकर यांचा उल्लेख केला होता. मात्र नंतर हे ट्वीट हटवण्यात आले आणि पाटकर यांचे नाव वगळून दुसरे ट्वीट त्यांनी केले आहे. राणे यांनी आधीचे ट्वीट का हटवले याबाबत सध्या उलटसुलट चर्चा सुरु आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अनिल परब उद्या चौकशीला हजर राहणार ? परब-संजय राऊत भेटीनंतर राऊतांनी केलं ‘हे’ भाष्य
- ‘ठाकरे सरकारचे नियम आमदार-खासदारांच्या मुलांना लागू होत नाही का?’ निलेश राणेंचा सवाल
- अनिल परब उद्या चौकशीला हजर राहणार ? परब-संजय राऊत भेटीनंतर राऊतांनी केलं ‘हे’ भाष्य
- ‘हिंदू सणांसाठी शेवटपर्यंत लढणार…’; दहीहंडीचे आयोजन करणाऱ्या मनसेच्या अविनाश जाधवांना अटक
- ‘राजसाहेबांचा आदेश…हिंदू सण साजरे होणारच, यंदाची दहीहंडी दणक्यात करा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
