Share

स्वतःला वाघ म्हणवणारे ठाकरे आता पवारांच्या ताटाखालचं मांजर झालेत – भाजप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकल्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. सचिन वाझे प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी नुकतेच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीबाबत आरोप करून खळबळ माजवून दिली आहे. यामुळे अनेक नेत्यांच्या व अधिकाऱ्यांच्या बैठकांचा सत्र सद्या सुरु आहे.

तर, अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपानंतर आता त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपने केली आहे . यासाठी भाजप आक्रमक झाली असून आंदोलने देखील केली जात आहेत. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील तणाव वाढत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनाम्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे.

त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात राजीनाम्याचा चेंडू टोलवला असला तरी चौकशी आधीच त्यांनी राजीनामा घेण्याची गरज नसल्याचे जाहीर केल्यामुळे भाजपने महाविकास आघाडी सरकारसह अनिल देशमुखांना लक्ष्य केलं आहे. तर, संजय राठोडांवर आरोप झाले तेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या दबावामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना त्यांचा राजीनामा घ्यावा लागला होता. मात्र, राष्ट्रवादीचे नेते व मंत्री धनंजय मुंडे व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप होताच शरद पवार यांनी त्यांचा केल्याची टीका = देखील भाजपने केली आहे.

‘केवळ खुर्चीच्या लालसेपोटी स्वतःला वाघ म्हणवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता शरद पवार यांच्या ताटाखालचं मांजर झाले आहेत. एकाच सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांना वेगवेगळे न्याय आणि नियम आहेत का? ज्याच्यावर आरोप झाले आहेत, त्यांनी राजीनामा द्यायलाच हवा.’ असं ट्विट भाजपच्या अधिकृत अकाउंट वरून करण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!