मुंबई : आता प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. या पार्श्वभूमीवर 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. सुरुवातीला इलेक्ट्रिक कार्सच्या बजेटमुळे या कार खरेदि केल्या जात नव्हत्या मात्र आता , कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच केली आहेत.
यामध्ये आता प्रसिद्ध कार निर्माती कंपनी जॅग्वार लँड रोवर इंडिया कंपनी भारतात त्यांची नवी इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच करणार आहे. जॅग्वार लँड रोव्हर इंडियाने त्यांची इलेक्ट्रिक एसयूव्ही आय- पेस 9 मार्च रोजी भारतात लाँच करण्याची घोषणा केली होती, मात्र हि तारीख पुढे ढकलत आज ही कार आता 23 मार्च 2021 रोजी लाँच करण्यात आली आहे, दरम्यान, जॅग्वार लँड रोवरने (जेएलआर) आधीच या मॉडेलसाठी बुकिंग सुरु करण्यात आली होती.
https://twitter.com/JaguarIndia/status/1373870120230002688?s=20
कारमध्ये एक स्लोपिंग बोनट, एलईडी हेडलॅम्प्स, हनीकॉम्ब पॅटर्न ग्रिल आणि डिटेल्ड सेंटर एअर-डॅम आहे. या इलेक्ट्रिक वाहनात आकर्षक दिसणारे सेट्स आणि हलके ORVM देखील मिळतील. या इलेक्ट्रिक एसयूव्हीची लांबी ४६९२ मिमी, रुंदी २०११ मिमी आणि उंची१५६६ मिमी आहे. व्हीलबेस आणि ग्राउंड क्लीयरन्स २९९०मिमी आणि १७४ मिमी आहे.
ही कार फूजी व्हाइट, कॅल्डेरा रेड, सॅन्टोरीनी ब्लॅक, युलाँग व्हाइट, इंडस सिल्व्हर, फिरेंज रेड, सेझियम ब्लू, बोर्स्को ग्रे, आयगर ग्रे, पोर्टोफिनो ब्लू, फर्लेन्डो पर्ल ब्लॅक आणि अरुबा कुलसह एकूण १२ रंगांमध्ये सादर केली जाणार आहे. आय-पेस इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये मॅट्रिक्स एलईडी हेडलाइट्स (केवळ एचएसई), ८ वे सेमी पावर्ड लक्सटेक स्पोर्ट सीट, ३८० W मेरिडियन साऊंड सिस्टम, इंटरअॅक्टिव्ह ड्रायव्हर डिस्प्ले, ३ डी सराउंड कॅमेरा, ड्रायव्हर कंडिशन मॉनिटर, अॅनिमेटेड डायरेक्शन इंडिकेटर, लेदर स्पोर्ट सीट्स, ८२५W मेरीडियन ३ डी सराउंड साउंड सिस्टम, हेड-अप डिस्प्ले, अडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल असे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.
दरम्यान, जेएलआर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रोहित सूरी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘लॅन्ड रोव्हर डिफेंडरच्या डिजिटल व्हेरिएंट ऑफरला दिलेल्या शानदार प्रतिसादानंतर आम्ही एसयूव्ही आय- पेस भारतात सादर करण्यास खूप उत्सुक आहोत.’
महत्वाच्या बातम्या
- पोलीस दलात बदल्यांचे मोठे रॅकेट, पुरावे घेऊन फडणवीस दिल्लीला रवाना
- आलिया नंतर आता धर्मा प्रॉडक्शन करणार शनायाला लॉन्च ; नेटकऱ्यांनी पुन्हा साधला घराणेशाहीवर निशाणा
- मद्यपान करण्यासाठी वयोमर्यादा ; मद्यपान विक्रीवर नवीन नियमावली
- …तर टेस्ला कंपनी बंद करणार एलन मस्क यांची भूमिका
- वाळू माफियाकडून दीड लाखाची लाच घेताना तहसीलदार अटकेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

