Share

‘इतिहासात लबाड म्हणून ठाकरे सरकारची नोंद होईल’

Published On: 

बीड : विधानसभा अधिवेशनात वीज बिल प्रश्न गाजला. सरकारने वीज कनेक्शन मोहीम तातडीने स्थगित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले. शेतकरी व सामान्य वीज ग्राहकांना दिलासा मिळाला. परंतु अधिवेशन संपताच सरकारने शब्द फिरवून पुन्हा शेतकरी बांधवांना ४४० चा झटका दिला, यामुळे इतिहासात लबाड म्हणून ठाकरे सरकारची नोंद होईल, असा टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केली आहे.

दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, बांधावर जावून नूकसान भरपाईची मदत देण्यासाठी दिलेला शब्द असो अथवा सभागृहात दिलेला शेतकऱ्यांच्या हिताचा कोणताही शब्द सरकारने पाळला नाही. आठच दिवसात सरकारने यु टर्न घेतला. वीज बिल थकले तर कनेक्शन तोडण्याची घोषणा करून सरकारने लबाडीवृत्तीचे दर्शन घडवले. महाराष्ट्राच्या इतिहासात लबाड सरकार म्हणून ठाकरे सरकारची नोंद होईल, मागील दुष्काळी स्थिती व कोरोना लॉकडाऊन अर्थिक संकटात थकलेले वीज बिल तसेच रिडींग न घेता दिलेल्या अवाजवी बीलाचा बोजा सामान्य जनतेवर लादला.

वीज बिलात सवलत द्यावी. वीज बिल दुरुस्ती करावी. सक्तीची वसुली करू नये. या मागणीसाठी भाजपाने आंदोलन केले. विधानसभा अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी फसवी घोषणा करून जनतेशी विश्वासघात करण्याचे पाप ठाकरे सरकारने केले आहे. महाविकास आघाडीतील तीन पक्ष केवळ सत्तेचा उपभोग घेण्यासाठी एकत्रित आले. फसवेगिरीसाठी तिनही पक्षात कायम एकमत आहे. लोकांच्या हितासाठी एकमत होत नाही. सामान्य जनतेशी त्यांचे काही देणे घेणे नाही.

कोरोना काळात उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज बिलात सुट म्हणून किमान १०० युनीट सवलत देण्याचे जाहीर केले. ही घोषणा सरकारने मागे घेतली. वीज बिलाचे श्रेय काँग्रेसच्या पारड्यात पडू नये. यासाठी शेतकरी व सामान्य वीज ग्राहकांना वेठीस धरण्याचे काम केल्याने हा अन्याय जनतेच्या वाट्याला आला. हा अन्याय जनता कदापि विसरणार नाही. शेतकऱ्यांसाठी एकही हिताचा निर्णय घेतला नाही. अशा लबाड सरकारला धडा शिकविण्यासाठी जनता सज्ज होत आहे. याचे भान सरकारने घ्यावे, असा इशारा राजेंद्र मस्के यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!