🕒 1 min read
औरंगाबाद : राज्यात जनतेचे काम करणारे सरकार असून ‘ठाकरे सरकार’ म्हणजे जे बोलणार ते करून दाखवणारच. औरंगाबाद जिल्ह्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे विशेष प्रेम होते. आणि कर्म, धर्म, संयोगाने जनतेच्या आशीर्वादामुळे मी मंत्री आहे. त्यामुळे शहराच्या विकासासाठी तत्पर राहून निधी कमी पडू देणार नाही. असे आश्वासन राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिले. महानगरपालिका क्षेत्रातील सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून महानगरपालिका क्षेत्रातील वाॅर्ड क्रमांक ४०, गणेशनगर सहकारी गृहनिर्माण हाऊसिंग सोसायटी येथे करण्यात येणार्या सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे भूमिपूजन शनिवारी (दि. २५) रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार अंबादास दानवे, विधानसभा संघटक राजू वैद्य, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे म्हणाले की निवडणुका आहेत म्हणून विकास कामे करायची असे नसून शिवसेना कायम समाजसेवा, जनतेच्या सेवेला प्राधान्य देत आली आहे. राज्यात आज शिवसेना सत्तेत आहे. ठाकरे सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकास कामे करून या शहराला सुपर संभाजीनगर करू. यापुढेही शहराच्या विकासासाठी आमची भूमिका अग्रेसर राहील. आणि शहराचा विकास करत असतानाच हिंदुत्वाचा विचार सुद्धा पुढे घेऊन जाऊ असे प्रतिपादन शिवसेना प्रवक्ते आमदार दानवे यांनी केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधानसभा संघटक राजू वैद्य यांनी केले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘संज्या ते पवार कुटुंब; वाढदिवसाच्या शुभेच्छा ही देतील आणि पाठीमागे तिरडी सुद्धा बांधतील’
- प्रभू श्रीराम संपूर्ण जगाचे, फक्त भाजपा किंवा आरएसएसचे नाही- फारूख अब्दुल्ला
- बँक विलीनीकरणाच्या प्रक्रियेवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन खुश, म्हणाल्या…‘
- उद्याचा भारत बंद सर्वसामान्यांचा हक्क मारणाऱ्या मोदी सरकार विरोधात-नाना पटोले
- …तर मोदीही सांगतील मी संजय राऊत यांच्या समोरच राहतो’; राऊतांची मिश्किल टिपण्णी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
