🕒 1 min read
औरंगाबाद: शिवसेना-भाजप युतीचा निर्णय फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेऊ शकतात. याबाबतीत अब्दुल सत्तार यांना बोलण्याचा काहीही अधिकार नाही. अशा शब्दांमध्ये शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे(Chandrakant Khaire) यांनी त्यांच्या विधानावर टीका केली आहे. अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांनी केलेल्या विधानामुळे शिवसेनेतील अंतर्गत कलह सर्वांसमोर येतांना दिसून येत आहे. या आधी देखील खैरेंनी युतीच्या वक्तव्यावरून अनेकांना फटकारल्याचे दिसून आले आहे.
जळगाव महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या दरम्यान येणाऱ्या समस्या व अडीअडचणीची सोडवण्यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी (दि.४) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांची दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटी दरम्यान भाजप आणि शिवसेना युतीचा पूल फक्त केंद्रीय मंत्री नितिन गडकरीच बांधू शकतात. असे वक्तव्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. मात्र त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकारणात मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.
या विशेष भेटीनंतर गडकरीं विषयी सत्तार म्हणाले, नितीन गडकरी हे राजकारणाचे चालते बोलते विद्यापीठ आहे. ते राज्याचेच नव्हे तर देशाचे नेते आहेत. त्यांनी पूल बांधण्याचे ठरवल्यास तो कसा जोडायचा हे देखील त्यांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना युतीचा पूल जोडण्याचे काम त्यांनी मनावर घेतले तर ते नक्कीच ते पूर्णत्वाकडे नेऊ शकतात. असे विधान सत्तार यांनी केले होते.
सत्तार यांनी केलेले विधान चुकीचेच
सत्तार यांच्या विधानाचा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी त्यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. खैरे म्हणाले अब्दुल सत्तार यांना युतीबद्दल बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही. त्याबाबत निर्णय हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील. तसेच शिवसेनेचे नेते संजय राऊत याविषयी बोलू शकतात. अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे विधान हे चुकीचे आहे. अशाप्रकारे खैरेंनी सत्तारांना घरचा आहेर दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सिंधुताई यांच्याशी खास नातं..’ म्हणत पडद्यावर सिंधुताई सपकाळ साकारणारी तेजस्विनी पंडित झाली भावूक
- विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर कोरोना पॉझिटिव्ह; ट्वीट करत दिली माहिती
- बाईकवर किस करणाऱ्या ‘त्या’ तरुणाला अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- “नकली घोड्यावर बसणाऱ्या ‘मैने’ला पद्म पुरस्कार दिला जातो पण…”, रोहित पवारांचा कंगनाला अप्रत्यक्ष टोला
- “सध्याच्या महाराष्ट्राला कोणी वालीआहे का?”, सदाभाऊंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
