🕒 1 min read
मुंबई: मागील काही दिवसांपासून राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा प्रश्न आता गंभीर बनू लागला आहे. न्यायालयाने आंदोलक कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे निर्देश दिलेले असताना दुसरीकडे महामंडळाने कारवाईत वाढ केली असून बुधवारी ५४२ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. त्यामुळे दोन दिवसांत निलंबित के लेल्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या ९१८ झाली आहे. आता यावरच भाजप नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
ठाकरे सरकार नीच प्रवृत्तीचे आहे, कालपासून एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन सुरू करण्यात आले व रात्री झोपलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचे काम हे प्रशासनाने सुरू केले. ही ठाकरे सरकारची जात आहे, प्रश्न कधी सोडवायचे नाही पण जो आवाज उठवतो त्याला संपवण्याचे काम ठाकरे सरकारने नेहमीच केले. असे ट्वीट करत निलेश राणे यांनी टीका केली आहे.
ठाकरे सरकार नीच प्रवृत्तीचे आहे, कालपासून एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन सुरू करण्यात आले व रात्री झोपलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचे काम हे प्रशासनाने सुरू केले. ही ठाकरे सरकारची जात आहे, प्रश्न कधी सोडवायचे नाही पण जो आवाज उठवतो त्याला संपवण्याचे काम ठाकरे सरकारने नेहमीच केले.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 11, 2021
दरम्यान सांगली विभागातील इस्लामपूर आणि आटपाडी आगारातील ५८ कर्मचाऱ्यांचा निलंबन मध्ये समावेश आहे. नागपूर आणि यवतमाळ विभागातील विविध आगारांतील प्रत्येकी ४६ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. नाशिक विभागातीलही ४० कर्मचाऱ्यांचाही यात समावेश आहे. अन्य विभागांतही विविध कारवाया झाल्याचे महामंडळाने सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- शेवटी ज्याचं जळतं त्यालाच कळतं; एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन चंद्रकांत पाटलांचा टोला
- नवाब मलिक स्वत:ची कबर स्वत:च खोदत आहेत; चंद्रकांत पाटलांचा इशारा
- जेवढे कर्मचारी दाबाल तेवढे उसळून उठतील- प्रविण दरेकर
- राज्याच्या हिताच्या दृष्टीने एकदा विचार करा; संजय राऊतांचं कर्मचाऱ्यांना आवाहन
- कर्मचाऱ्यांना आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

