🕒 1 min read
मुंबई: भारतीय संघातुन असलेला अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने आयपीएल २०२२ च्या १५ व्या हंगामासाठी पूर्ण तयारी केली आहे आणि आता तो मैदानात उतरण्यासाठी उत्सुक आहे. गुजरात टायटन्सने रविवारी रात्री आपली नवीन जर्सी लाँच केली आहे. आपल्या होम ग्राउंड नरेंद्र मोदी स्टेडियमवर या कार्यक्रमाचे आयोजिन करण्यात आले होते. जर्सीच्या लाँचिंगवेळी कर्णधार हार्दिक पांड्यापासून बीसीसीआयचे सचिव जय शाह देखील उपस्थित होते. यादरम्यान हार्दिकने आपल्या गोलंदाजीबाबत आश्चर्यकारक विधान केले आहे.
हार्दिक पंड्याला (hardik pandya) जेव्हा पत्रकाराने विचारले की तो आगामी आयपीएलमध्ये गोलंदाजी करताना दिसणार आहे का, तेव्हा कर्णधाराने हसत उत्तर दिले आणि म्हणाला, ‘हे सर्वांसाठी सरप्राईज असेल. यापेक्षा अधिक मी काही सांगू शकत नाही.” गतवर्षी संपलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाच्या पराभवानंतर त्याला भारतीय संघात संधी मिळाली नाही आणि त्याचे अनफिट असणे हेही प्रमुख कारण ठरत आहे.
The First one is always special — aapdi jersey ????#SeasonOfFirsts #GujaratTitans #TATAIPL #IPL pic.twitter.com/msD7USzfQh
— Gujarat Titans (@gujarat_titans) March 13, 2022
सध्या गोलंदाजीबाबत गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने काहीही स्पष्ट सांगितले नाही. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीबाबत अजूनही संभ्रम आहे. गेल्या वर्षी त्याने आयपीएल २०२२ च्या संपूर्ण हंगामात गोलंदाजी केली नव्हती. फलंदाजीतही त्याची कामगिरी खूपच खराब होती. मुंबईने त्याला यावेळेस कायम न ठेवण्यामागे कदाचित त्याचा आउट ऑफ फॉर्म असणे हेच मोठे कारण असावे.
महत्वाच्या बातम्या
- “गोव्यात कधीच पक्ष जिंकत नाही तर…”, संजय राऊतांची प्रतिक्रिया
- सत्ताधारी पक्षाचे नेते हुकूम मानतात का?- संजय राऊत
- “…तर भाजपला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही”, संजय राऊतांचा दावा
- देशात निवडणुकीपूर्वी अनेक मुद्दे जिवंत केले जातात- संजय राऊत
- IND vs SL: ‘तो दुर्दैवी ठरतोय’ विराटच्या ढासळत्या फॉर्मवर ; माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
