मुंबई: शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav), त्यांचे सहकारी आणि बीएमसी कंत्राटदार यांच्या निवासस्थानी २५ फेब्रुवारी रोजी ईडीला काही महत्त्वाचे पुरावे मिळाले होते. तपासात जाधव यांनी केलेल्या कोट्यवधींच्या संशयास्पद नोंदी असलेली डायरी सापडली असून अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, डायरीतील एका नोंदीमध्ये मातोश्रीला ५० लाख रुपयांचे घड्याळ तसेच गुढीपाडव्याला २ कोटी रुपयांची भेट पाठवल्याचा उल्लेख आहे.यावरूनच भाजप नेते निलेश राणे (nilesh rane) यांनी थेट ठाकरे कुटुंबावर निशाणा साधला आहे.
“मातोश्री वाल्यांना पैसे आणि गिफ्ट द्याल तरच पदं मिळतात हे परत एकदा सिद्ध झालं. ठाकरे कुटुंब तुरूंगात गेले पाहिजे तेव्हाच कळेल हे सगळे पैसे जमा करून ठेवले आहेत ती गुफा कुठे आहे. २५ वर्ष मुंबईला लुटणारे कुटुंब म्हणजे ठाकरे कुटुंब, त्यांना जेल झालीच पाहिजे.”, अशी भूमिका निलेश राणे यांनी ट्वीट करत मांडली आहे.
दरम्यान, यशवंत जाधव यांनी बीएमसीच्या ३० कोटी रुपयांच्या विविध कंत्राटांसाठी बिमल अग्रवाल यांची मर्जी राखल्याचा संशय आहे. जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव या मुंबईतील भायखळ्याच्या आमदार असून त्यांनी २०१९ मध्ये प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. कोलकाता येथील प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीकडून झालेल्या व्यवहाराची माहिती प्राप्तिकर विभागाला या शपथपत्रातून मिळाली होती. जाधव आणि कुटुंबीयांनी भायखळा येथील इमारत खरेदीसाठी सुमारे १५ कोटी रुपये कंपनीने दिले होते. जाधव कुटुंबीयांनी नंतर हे पैसे कंपनीला परत केले, जे नंतर कंपनीने न्यूजहॉक मल्टीमीडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे हस्तांतरित केले.
महत्वाच्या बातम्या:
“किरीट सोमय्या त्यांचं आंदोलन करण्यास समर्थ”- चंद्रकांत पाटील
तुम्ही तूर्तास यशवंत जाधवांवर बोला; ‘त्या’ वक्तव्यावरून भातखळकरांचा राऊतांना टोला
…त्यामुळे ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट सर्वांनी पाहावा- अमित शहा
‘पाणी वाचवा’ मोहिमेत मोदींना मुलांकडून अपेक्षा; ‘Water Warrior’ म्हणत केले ‘हे’ आवाहन
बुऱ्हान वाणीचे समर्थन करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती भाजपच्या ‘मैत्रीण’- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

