सातारा : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या रडारवर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कुटुंबीय आले आहे. कराड येथे पत्रकार परिषद घेऊन सोमय्या यांनी अलिबाग येथे जाणार असल्याचे जाहीर केले आहे. ‘अलिबाग आणि जरंडेश्वर येथेही उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी केलेल्या चुकीच्या व्यवहारांची माहिती घेण्यासाठी जाणार आहे. अलिबाग येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांच्या नावाने घेतलेल्या बेनामी मालमत्तेची चौकशी करण्यासाठी जाणार’ असे सोमय्यांनी म्हटले.
हसन मुश्रीफ यांच्या कारखान्याची पाहणी करण्यासाठी सोमय्या कोल्हापूरकडे निघाले होते. पण सकाळीच त्यांना कराड येथे पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. ‘ठाकरे कुटुंबाकडे १९ बंगले आहेत. हे बंगले कुठून आले? उद्धव ठाकरे यांनी पत्नीच्या नावे बंगले घेतले आहेत. त्यामुळे सोमवारी अलिबागला जाऊन उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या नावाने घेतलेल्या बंगल्याची पाहणी करणार आहे, असं सोमय्या यांनी सांगितले.
तसेच गणेश विसर्जनादिवशी सकाळी मला माझ्याच कार्यालयात ४ तास रोखण्यात आलं. मला का रोखण्यात आलं याचं उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील देणार का? मला कोल्हापूरात प्रवेशबंदी आहे. मग मुंबईत मला का रोखलं जातंय? कोल्हापूरच्या वेशीवर रोखा, असं म्हणत सोमय्यांनी पोलिसी कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
महत्वाच्या बातम्या:
- मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा कधी खेळेल सामना?, प्रशिक्षकाने केला खुलासा
- ‘कोल्हापूरला पोहचण्याआधीच पोलिसांचा मज्जाव, सोमय्यांना कराड येथे रोखलं’
- पंजाबमध्ये असणार आता दोन उपमुख्यमंत्री; नवज्योतसिंग सिद्धूंच्या सहमतीनेच मुख्यमंत्र्यांची निवड
- मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने चेन्नईला सावरलं; झुंजार अर्धशतक पूर्ण
- ‘मला गृहमंत्र्यांना विचारायचं, तुम्ही कोणत्या अधिकाराअंतर्गत गणेश विसर्जनापासून रोखलं?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
