Share

ठाकरे सरकारचं ठरलं ; ग्रामीण भागात ८ वी ते १२ वीचे वर्ग भरणार

Published On: 

मुंबई : कोरोना महामारीच्या वैश्विक संकटामुळे गेल्या गेल्या अनेक दिवसांपासून शाळा महाविद्यालये बंद आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून ज्या गावांत, वाडया, वस्त्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला नाही तसेच ज्या गावात कोरोना आला परंतु उत्तम नियोजनातून कोरोना मुक्त गाव करण्यात आली.

अशा ठिकाणी कोरोनाविषयक जबाबदारी पालक,शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत यांनी घेतल्यास जिल्हा परिषदेच्या संबिधीत विभागामार्फत परिस्थितीची खातरजमा करून शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी अन्रेकांकडून केली जात होती. याच पार्श्वभूमीवर ज्या ग्रामीण भागात कोरोना हद्दपार झाला आहे अशा ठिकाणी आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात मान्यता देण्यात आली आहे. राज्य सरकारने याबद्दल आदेश जारी केला.

ग्रामीण भागात कोरोनाची लागण कमी झाली आहे. त्यामुळे अनेक गाव हे कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे अशा भागात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागात कोविडमुक्त गावातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहे.

मात्र या साठी ग्रामपंचायतीने शाळेच्या अखत्यारीतील पालकांशी चर्चा करून ठराव करावा लागणार आहे. संबंधित शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था त्याच गावात करावी लागणार आहे किंवा त्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था न वापरण्याची दक्षता घ्यावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे. तसेच एका वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी संख्या मर्यादित असणार आहे. सतत हात साबणाने धुणे, मास्क घालणे हे पाळव लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!