नाशिक : देशाने गुरुवारी कोविड प्रतिबंधक लसीकरणाचे शंभर कोटींचे लक्ष्य पूर्ण केले. यात महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे. राज्यात आतापर्यंत साडेनऊ कोटी लसीकरण झाले आहे. आजही लसीचे दोन्ही डोस पूर्ण करणाऱ्यांत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे.
दरम्यान, देशातील ७० टक्के जनतेने कोरोनाचा पहिला डोस घेतल्याची बाब ऐतिहासिक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक दिवशी लसीकरणात वाढ कशी होईल याबाबत बारकाईने लक्ष ठेवल्यामुळे हे यश मिळाले आहे. आता सर्व राज्यांना सूचना केल्या असून लसीकरणाचा वेग कसा वाढवता येईल याचे नियोजन करणे, ज्या भागात लसीकरण कमी आहे त्यामागची कारणे शोधणे तसेच ठिकठिकाणी ‘कोरोना टिकाकरण’ कार्यक्रमावर भर दिला जाणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली.
त्या म्हणाल्या की, १०० कोटी कोरोना लसीकरणाचा टप्पा देशासाठी ऐतिहासिक आहे. अवघ्या नऊ महिन्यांत एवढी मोठी प्रक्रिया पार पडणे आव्हानात्मक होते. जगातील अनेक देशांना जे करणे शक्य झाले नाही, ते भारताने करून दाखवले. सुमारे ३० टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच १८ वर्षांखालील बालकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याबाबत सध्या प्रयोगशाळेत चाचण्या केल्या जात आहे. जोवर बालकांच्या सुरक्षिततेची हमी मिळणार नाही तोवर चाचण्या सुरू राहतील. त्याबाबत कोणतीही जोखीम पत्करली जाणार नाही, असेही डॉ. पवार यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आघाडीवर नाराज अन् भाजपवर खुश असं काही नाही; जो आडवा येईल, त्याला तुडवायचं हेच माझं धोरण’
- ‘..याचा अर्थ लसींसाठी महाविकास आघाडी सरकारची रडारड खोटी होती’, भाजपची टीका
- ‘नितीन राऊतांनी माफी मागावी अन्यथा मुख्यमंत्री ठाकरेंनी गुन्हा दाखल करण्याचा आदेश द्यावा’
- भाजपच्या टीकेनंतर काँग्रेस मंत्री नितीन राऊत बॅकफुटवर, ‘ती’ वादग्रस्त पोस्ट केली डिलीट
- ‘तुमचंच सुरू ठेवायचं असेल तर ठेवा, मी निघून जातो’, अजित पवार पत्रकारांवर संतापले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
