हिंगोली : कळमनुरी येथे एका हौशी ३५ वर्षीय युवकाने रॅपिड अँटीजन तपासणी केली. मात्र, अहवाल पॉझिटिव्ह येताच त्याने आरोग्य विभागाच्या पथकाला गुंगारा देत पळ काढला. या प्रकारानंतर संबंधित युवकाला कळमनुरी पोलिसांनी ताब्यात घेऊन येथील कोविड केअर सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल केले. ही घटना आज बुधवारी घडली.
कळमनुरी बसस्थानकात बाहेर गावाहून आलेल्या प्रवाशांची रॅपिड अँटीजन तपासणी करण्यात येत आहे. बुधवारी शहरातील पोस्ट ऑफिस भागात एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या ३५ वर्षीय युवकाने हौस म्हणून त्या ठिकाणी रॅपिड अँटीजन तपासणी करण्याची मागणी केली. आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या युवकाची तपासणी केली. यानंतर आलेल्या अहवालात हा युवक या पॉझिटिव्ह आढळून आला.
आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या युवकाला तपासणी अहवालाची माहिती दिली. उपचारासाठी त्याला काही दिवस कोविड केअर सेंटरला थांबावे लागणार असल्याचे सांगितले. यानंतर गंमत अंगलट आल्याचे पाहताच संबंधित युवकाने लघुशंकेला जाण्याचे निमित्त केले. आणि घटनास्थळावरून पळून गेला. ही बाब आरोग्य विभागाच्या पथकाला निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्या युवकाचा शोध घेत त्याला बीएसएनएल कार्यालयजवळ असलेल्या वसाहतीमधून ताब्यात घेतले. सध्या त्याला पुढील उपचारासाठी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- धनंजय मुंडेंचा बदला पूर्ण, केला ‘हा’ बदल
- मिनी घाटीतील सौम्य लक्षणे असलेले रुग्ण इतरत्र हलवले
- ‘गृहमंत्र्यांना बैठकीसाठी गपचूप मागच्या दाराने यावं लागतं यापेक्षा अधिक नामुष्की काय असू शकेल?’
- जायकवाडीत भर उन्हाळ्यात फ्लेमिंगोचे आगमन
- ऑनलाइन परीक्षेवर भर द्या ; उदय सामंतांनी दिल्या कुलगुरूंना सूचना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

