औरंगाबाद : कधी काळी कोरोनामुक्त झालेले जिल्हा सामान्य रुग्णालय आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णांनी भरले आहे. जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे त्यामुळे मिनी घाटीत रुग्णांसाठी विशेष नियोजन केले जात आहे. मिनी घाटीत एकूण तीनशे बेड आहेत. याठिकाणी सध्या २५१ रुग्ण उपचार घेत आहेत. तर ४९ बेड उपलब्ध असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले.
कोरोनाचा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे आरोग्य विभागापुढे मोठे आव्हान वाढले आहे. अशा परिस्थितीत कोरोनामुक्त झालेली मिनी घाटी देखील आता पूर्णतः कोरोनाच्या रुग्णांवर उपचार घेण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये आज सकाळपर्यंत २५१ रुग्ण उपचार घेत असून ४९ बेड सध्या उपलब्ध आहेत.
मिनी घाटी रुग्णालयात ज्या रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत अशा रुग्णांना होम आयसोलेशन किंवा इतरत्र कोव्हीड केअर सेंटर मध्ये पाठविण्यात आले. ज्या रुग्णांना तात्काळ उपचार घेण्याची गरज आहे अशाच रुग्णांना बेड उपलब्ध होऊ शकतील. गंभीर रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी सौम्य लक्षणे असलेल्या ४० रुग्णांना काल इतरत्र कोविड केअर सेंटर मध्ये आणि काही रुग्णांना होम आयसोलेशनचा सल्ला देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘गृहमंत्र्यांना बैठकीसाठी गपचूप मागच्या दाराने यावं लागतं यापेक्षा अधिक नामुष्की काय असू शकेल?’
- जायकवाडीत भर उन्हाळ्यात फ्लेमिंगोचे आगमन
- ऑनलाइन परीक्षेवर भर द्या ; उदय सामंतांनी दिल्या कुलगुरूंना सूचना
- परभणी जिल्ह्यात ऊसतोड मजूर महिलेवर अत्याचार
- मोबाईलला नो नेटवर्क, ‘हॅलो, हॅलो’ करून ग्राहक पार वैतागले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

