मुंबई : येत्या १८ ते २२ जुन दरम्यान भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यापर्यंत भारतीय संघाचा प्रवास कसा झाला त्याचा हा आढावा. भारताचा सोळावा सामना इंग्लंडविरुद्ध २४ ते २८ फेब्रुवारी दरम्यान अहमदाबाद येथे झाला होता.
जगातील सर्वात मोठे मैदान असलेल्या नरेंद्र मोदी या स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकत इंग्लंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय आत्मघातकी ठरवला भारतीय गोलंदाज अक्षर पटेलने. इंग्लंडचा पहिला डाव केवळ ११२ धावांवर अटोपला. या डावात इंग्लंडकडुन सलामीवीर जॅक क्रॉलीने सर्वाधीक ५३ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर भारताकडुन अक्षर पटेलने बळीचा षटकार लगावला.
यानंतर प्रत्युत्तरात भारतीय संघाने चांगली सुरुवात केली. एकवेळ ९८ वर ३ बाद अशी स्थिती असताना इंग्लंडचा कर्णधार जो रुटच्या फिरकीच्या जाळ्यात भारतीय फलंदाज फसले आणि भारताचा डाव पत्ताप्रमाणे कोसळला आणि १४५ वर भारताचा डाव संपुष्टात आला. असे वाटले की हातातोडांशी आलेला घास गेला. या डावात भारताकडुन सलामीवीर रोहित शर्माने सर्वाधीक ६६ धावांची अर्धशतकी खेळी साकारली. तर इंग्लंड कडुन कर्णधार जो रुटने सर्वाधीक ५ गडी बाद केले.
पहिल्या डावात भारताना ३३ धावांची निसटती आघाडी मिळाली. इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात जोरदार पुनरागमन करणार अशी अपेक्षा होती. मात्र जे घडले ते कुणालाच अपेक्षित नव्हते. इंग्लंडचे फलंदाज आर आश्विन आणि अक्षर पटेल यांच्या जाळ्यात पुरते फसले आणि अवघ्या ८१ धावांवर इंग्लंडचा संपुर्ण संघ माघारी तंबुत परतला. या डावात बेन स्टोक्सने सर्वाधीक २५ धावांची खेळी केली. तर भारताकडुन अक्षर पटेलने पुन्हा एकदा फिरकीचे जाळे विनत ५ गडी बाद केले.
दुसऱ्या डावात भारतीय संघासमोर ४९ धावांचे माफक अव्हान होते. भारताने एकही गडी न गमवता हे लक्ष सहज पार केले. ११ गडी बाद करण्यासाठी अक्षर पटेलला सामनाविराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. हा सामना जिंकुन भारताने डब्ल्युटीसी अंतिम स्पर्धेतील आपले आव्हान जिवंत ठेवले होते. मात्र इंग्लंड स्पर्धेतुन बाहेर पडला होता. डब्ल्युटीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी भारताला मालिकेतील अखेरचा सामना जिंकणे गरजेचे होते. इंग्लंड विजयी झाला तर मात्र ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत पोहोचणार होता. अंतिम सामन्यासाठी एक शेवटचा वार करण्यासाठी भारतीय संघ सज्ज होता.
महत्वाच्या बातम्या
- सेना राष्ट्रवादी भाजपसोबत करणार कॉंग्रेसचाही सफाया ? शिवसेनेच्या पोटातील आज ओठांवर आले
- ठाकरे सरकारमध्ये चाललंय काय ? भुजबळ -राऊत झाले आक्रमक,भाजपला होणार फायदा ?
- ‘हा विषय प्रसादापर्यंतच मर्यादित राहू द्या, शिवभोजन थाळी देण्याची वेळ येऊ देऊ नका’
- नामांकित कंपनीच्या नावाने बनावट मास्क विक्री करणाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल
- ‘अरे हा तर फारूख शेख’ ; हिमेशचा जुना फोटो पाहून नेटकऱ्यांनी दिली प्रतिक्रिया

