मुंबई : येत्या १८ ते २२ जुन दरम्यान भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यापर्यंत भारतीय संघाचा प्रवास कसा झाला त्याचा हा आढावा. भारताचा आठवा सामना न्युझीलंडविरुद्ध २१ ते २५ फेब्रुवारी दरम्यान वेलींगटन येथे झाला होता.
नाणेफेक जिंकुन न्युझीलंडच्या संघाने भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. सलग सात कसोटी सामने जिंकुन आत्मविश्वासाने भरपुर भारतीय संघ यावेळी न्युझीलंडला भारी पडणार असे सर्वांचे भाकित होते. मात्र न्युझीलंडसमोर भारतीय फलंदाजी पुन्हा ढेपाळली. पहिल्या डावात भारतीय संघ १६५ धावा करुन बाद झाला. अंजिक्य रहाणेने भारताकडुन सर्वाधिक ४६ धावांची खेळी केली. इतर फलंदाज फारशी चमक दाखवु शकले नाही. न्युझीलंडकडुन कायली जेमीनसन आणि टीम साउदी यांनी प्रत्येकी ४-४ गडी बाद केले.
भारताच्या १६५ धावांचा पाठलाग करताना न्युझीलंडच्या संघाने ३४८ धावांची मजल मारली. न्युझीलंडचा कर्णधार केन विलियमसन पुन्हा भारताच्या गोलंदाजाना नडला. त्याने न्युझीलंडकडुन सर्वाधीक ८९ धावांची खेळी साकारली. त्याला रॉस टेलर(४४), डी ग्रॅंधोम(४३), कायली जेमीनसन(४४) यांनी चांगली साथ दिली. न्युझीलंडचा अखेरचा फलंदाज ट्रेंट बोल्टने २४ चेंडुत ३८ धावांची वेगवान खेळी साकारली. इशांत शर्माने या डावात भारताकडुन सर्वाधीक ५ गडी बाद केले.
पहिल्या डावात न्युझीलंडच्या संघाला १८३ धावांची निर्णायक आघाडी मिळाली. सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय संघ पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती. सलामीवीर पृथ्वी शॉ स्वस्तात बाद झाल्यानंतर मंयक अग्रवालने काही काळ झुंज दिली. मात्र ५८ धावांवर तो बाद झाला आणि भारतीय संघाची फलंदाजी पुन्हा कोसळली. दुसऱ्या डावात भारतीय संघ १९१ धावांची मजल मारु शकला. आणि भारताकडे केवळ ८ धावांची आघाडी घेतली. सलामीवीर मंयक अग्रवालने या डावात सर्वाधिक ५८ धावांची अर्धशतकी खेळी साकारली. या सामन्यातील भारताकडुन हे एकमेव अर्धशतक होते. तर न्युझीलंडकडुन टीम साउदीने ५ गडी बाद करत भारतीय फलंदाजीला खिडांर पाडले. बोल्टने ४ गडी बाद करत त्याला पुरेपुर साथ दिली.
दुसऱ्या डावात न्युझीलंडने ९ धावांचे अल्प लक्ष्य एकही गडी न गमवता सहज पार करत १० गडी राखुन भारतीय संघाचा पराभव केला. ९ गडी बाद करण्यासाठी टीम साउदीला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारताविरुद्धचा हा विजय न्युझीलंडच्या संघासाठी १००वा विजय होता. तसेच न्युझीलंडचा अनुभवी खेळाडु रॉस टेलरचाही हा १००वा कसोटी सामना होता. अशा प्रकारे न्युझीलंडच्या संघाने भारताचा विजय रथ रोखला.
महत्वाच्या बातम्या
- ‘इंग्लंडविरुद्ध रोहित २-३ शतके आरामात ठोकणार’, आकाश चोप्राचे भाकित
- ड्यू प्लेसिसनं दुखापतीनंतर दिली अपडेट, म्हणाला…
- दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नीचे करोनामुळे निधन
- डुप्लेसीसच्या गंभीर दुखापतीनंतर पत्नीची भावुक करणारी पोस्ट
- डब्ल्युडब्ल्युईचा ‘जॉन’ निघाला ‘विराट’चा फॅन ; शेअर केला फोटो
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

