मुंबई : आयसीसीच्या पहिल्या वहिल्या जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याला अवघे ४ दिवस बाकी आहेत. या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दोन्ही संघ इंग्लंडमध्ये असुन पुर्णपणे तयार झाले आहेत. या सामन्यानंतर भारताचा सलामीवीर रोहित शर्माबद्दल अनेकांनी भाकित व्यक्त केले आहे.
या दरम्यान भारताचा माजी सलामीवीर आणि क्रिकेट समालोचक आकाश चोप्राने आगामी इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसंदर्भात एक मोठ वक्तव्य केले आहे. ‘आगामी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत रोहित आरामात २-३ शतके ठोकणार. कारण इंग्लंडमध्ये आयोजीत २०१९ विश्वचषक स्पर्धेत रोहितने ५ शतके केली होती. त्यामुळे इंग्लंडमधील ६ कसोटी सामन्यातील १२ डावात २-३ शतक तर तो आरामात ठोकणार.’ असा विश्वास आकाश चोप्राने व्यक्त केला आहे.
इंग्लंडमधील परिस्थीतीच्या अनुभवामुळे आकाश चोप्राने हे भाकित वर्तवले आहे. यादरम्यान भारतीय संघ सध्या आपपासात सराव सामना खेळत आहे. तर न्युझीलंडच्या संघाने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका १-० अशा फरकाने जिकंली आहे. येत्या १८ ते २२ जुन दरम्यान दोन्ही संघ आपापासात डब्ल्युटीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भिडणार आहे. यानंतर ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात भारत आणि इंग्लंड संघादरम्यान ५ कसोटी सामन्याची मालिका होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ड्यू प्लेसिसनं दुखापतीनंतर दिली अपडेट, म्हणाला…
- दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नीचे करोनामुळे निधन
- डुप्लेसीसच्या गंभीर दुखापतीनंतर पत्नीची भावुक करणारी पोस्ट
- डब्ल्युडब्ल्युईचा ‘जॉन’ निघाला ‘विराट’चा फॅन ; शेअर केला फोटो
- ‘…तर इंग्लंड बॅटिंगसाठी चांगली जागा आहे’ ; अजिंक्य रहाणेने दिल्या बॅट्समनना टिप्स
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

