हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील असोलवाडीत एका शेतकऱ्याच्या कुक्कुटपालन केंद्रातील ३०० कोंबड्या दगावल्याची घटना घडली आहे. पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने कुकुटपालन केंद्राला भेट देऊन पाहणी केली आणि पाच कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळ आणि पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत.
असोलवाडी येथील लक्ष्मण गुहाडे नावाच्या शेतकऱ्याने शेतीला जोडधंदा म्हणून या वर्षीच कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला. मात्र, शुक्रवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास ते कोंबड्यांना खाद्य टाकण्यासाठी शेडजवळ गेले, तेव्हा त्यांना कुक्कुटपालन केंद्राली सर्व कोंबड्या दगावल्याचे दिसून आले.
दरम्यान, याबात कळताच जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीश पाचपुते यांनी गुहाडे यांच्या कुक्कुटपालन केद्राला भेट दिली. तसेच या प्रकाराची माहिती पशुसंवर्धन विभागाला दिली. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी डॉ. माधव आठवले यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
महत्वाच्या बातम्या
- जालना महानगरपालिका होणार! नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंचे संकेत
- जालना महापालिका होण्यास आमदार कैलास गोरंट्याल यांचा विरोध
- इंधन दरवाढीला मनपाचा सुखद धक्का ; १० वाहन चार्जिंग स्टेशन उभारणार
- भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली; दोघांचा मृत्यू
- “जालना हा शिवसेनेचा बालेकिल्ला; खोतकरांनी केलेल्या विकासाच्या मागण्या पूर्ण करू”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
