🕒 1 min read
औरंंगाबाद : दारू पिऊन तर्रर्र झाल्यानंतर शहागंज परिसरात मनमानी करीत व्यापाऱ्यांना आणि किरकोळ विक्रेत्यांना हजारो रूपयांचा दंड आकारून त्रास देणाऱ्या मनपाच्या दोन मद्यपी कर्मचाऱ्यांना व्यापाऱ्यांनी आणि विक्रेत्यांनी बदडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना शुक्रवारी (दि.७) सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली असल्याची माहिती सिटीचौक पोलिस ठाण्याच्या सुत्रांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर विलास साळवे (वय २७, रा.कैलासनगर), अभिलेष रविंद्र शिंदे (वय २६, रा.सातारा परिसर) अशी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मनपाच्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. सध्या शहरात कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे नागरिकांना मास्क लावण्याची सक्ती करण्यात आली आहे. तसेच न्यायालयाच्या आदेशाने प्लास्टीक बंदीची मोहिम मनपाच्या वतीने राबविण्यात येत आहे.
शुक्रवारी सकाळी सागर साळवे व अभिलेष शिदे या दोघांनी यथेच्छ मद्यपान केले. त्यानंतर दोघांनी शहागंज परिसरातील व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत मनमानी कारभार करीत दंड आकारण्यास सुरूवात केली. यावेळी दोघांच्या गळ्यात मनपाचे ओळखपत्र होते, दंड आकारण्यावरून व्यापाऱ्यांसोबत त्यांची बाचाबाची झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी सागर साळवे व अभिलेष शिंदे या दोघांना बेदम चोप देत सिटीचौक पोलिसांच्या स्वाधीन केले.
महत्त्वाच्या बातम्या
- आयपीएल स्थगितीनंतर सकारिया गेला रुग्णालयात ; घेतली कोरोनाग्रस्त बापाची भेट, म्हणाला…
- लोकप्रतिनिधींना घराबाहेर पडू देऊ नका, रस्त्यातच आडवा;उदयनराजे आक्रमक
- ‘मराठा आरक्षण फडणवीसांनी दिले; एकही मराठा मुख्यमंत्री मराठा आरक्षण देऊ शकला नाही’
- आयपीएल -14 चे उर्वरित सामने कधी आणि कोठे होतील? ‘हे’ आहेत पर्याय
- कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन आरोग्य विभागाने सतर्क रहावे – अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
