मुंबई : सध्याचा भारतीय संघ क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत वर्चस्वपूर्ण खेळ करतो आहे. तसेच मायदेशातच नव्हे तर परदेशातही कठीण परिस्थितीत देखील भारतीय संघ विजय मिळवण्यात यशस्वी ठरतो आहे. त्यामुळे या संघाच्या कामगिरीची भुरळ दिग्गजांना नाही पडली तरच नवल. यातच आता भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीची भर पडली आहे.
सध्याच्या भारतीय संघाचे अनेक दिग्गजांनी भरभरून कौतुक केले आहे. संघातील सगळेच खेळाडू संधी मिळताच फायदा उठवून दमदार कामगिरी करत आहेत. आता गांगुलीने या संघातील आपल्या आवडत्या खेळाडूचे नाव सांगितले आहे.
रीषभ पंतच्या खेळामुळे प्रभावित भारतीय क्रिकेट बोर्डाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले की, हा विकेटकीपर फलंदाज ‘सामना जिंकणारा खेळाडू’ आहे. पुढे गांगुली म्हणाले, विराट कोहली आणि रोहित शर्माची फलंदाजी पाहणे मला आवडते.
गांगुली एका ऑनलाइन कार्यक्रमा दरम्यान म्हणाले, काही महान खेळाडू आहेत आणि बीसीसीआय मंडळाचे अध्यक्ष म्हणून मला वाटते की माझा आवडता खेळाडू कोण आहे हे कुणाला सांगू नये. माझ्या सर्व आवडी माझ्यासाठी आहेत, परंतु मी कोहलीच्या खेळाचा आनंद घेत आहे, मी रोहित शर्माच्या खेळाचा आनंद लुटतो.
गांगुलीने भारतीय संघातील गोलंदाजांचे देखील यावेळी कौतुक केले. तो म्हणाला, ‘मी जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचा चाहता आहे. मोहम्मद शमी देखील एक उत्तम गोलंदाज आहे. याशिवाय शार्दूल ठाकूरने गेल्या काही महिन्यात केलेल्या कामगिरीने मला प्रभावित केले आहे. त्याचा खेळाप्रति असलेला दृष्टिकोन मला भावतो.’
महत्त्वाच्या बातम्या
- आरोग्य सुविधा उभ्या करू पण डॉक्टर नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचारी कुठून आणायचे ?
- खळबळजनक! पॉझिटिव्ह रुग्ण थेट अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या दालनात
- विश्वचषक जिंकल्यानंतर धोनीने का केले होते मुंडन ? संघ व्यवस्थापकाने दिले ‘हे’ उत्तर
- देशात कोरोनाचा विस्फोट; कालची आकडेवारी पाहून तुम्हीही लावाल डोक्याला हात
- ‘आणखी दोन-तीन वर्षे निवृत्तीचा विचार करणार नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

