🕒 1 min read
मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर, केंद्र सरकारतर्फे देखील महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पहिल्या टप्प्यातील मुंबईच्या सामन्यांबाबत प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. येत्या 9 एप्रिलपासून इंडियन प्रीमियर लीगचे 14 वे सीजन सुरु होणार आहे. मात्र IPL सुरु होण्यापूर्वीच या सामन्यावर कोरोनाचे सावट पडले आहे.मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु होणा-या IPL 2021 च्या पहिल्या सामन्यापूर्वीच या स्टेडियमवरील 8 कर्मचा-यांना करोनाची लागण झाली आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबईमध्ये लॉकडाऊन लागू करण्याचा विचार महाराष्ट्र सरकार करत आहे, अशी चर्चा आहे. याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती जाहीर झालेली नसली तरी मुंबईसह महाराष्ट्रावर सध्या लॉकडाऊनची टांगती तलवार आहे. मुंबईमध्ये 10 एप्रिल ते 25 एप्रिल दरम्यान आयपीलचे दहा सामने होणार आहेत. लॉकडाऊन किंवा आणखी कडक निर्बंध लादण्याचा निर्णय सरकारनं घेतल्यास हे सामने अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयनं प्लॅन बी वर काम करण्यास सुरुवात केली आहे.
मुंबईतील सामने गरज पडली तर हैदराबादमध्ये होऊ शकतात. ‘ईएसपीएन क्रिकइन्फो’ या वृत्तसंस्थेनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. आयपीएल स्पर्धा ही यंदा मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळुरु आणि अहमदाबाद या सहा शहरांमध्ये होणार आहे. या सहा शहरांमध्ये हैदराबादचा समावेश नाही. मुंबईमध्ये लॉकडाऊन लागू झाल्यास पर्याय म्हणून हैदराबादला पसंती मिळू शकते. बीसीसीआयनं याबाबत अद्याप कोणत्याही फ्रँचायझीला मुंबईतील सामने दुसरीकडं खेळवण्याबाबतची माहिती दिलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- आरोग्य सुविधा उभ्या करू पण डॉक्टर नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचारी कुठून आणायचे ?
- खळबळजनक! पॉझिटिव्ह रुग्ण थेट अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या दालनात
- विश्वचषक जिंकल्यानंतर धोनीने का केले होते मुंडन ? संघ व्यवस्थापकाने दिले ‘हे’ उत्तर
- देशात कोरोनाचा विस्फोट; कालची आकडेवारी पाहून तुम्हीही लावाल डोक्याला हात
- ‘आणखी दोन-तीन वर्षे निवृत्तीचा विचार करणार नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
