मुंबई : भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने निवृत्तीवर मोठं भाष्य केलं आहे. कारण सात्यत्याने कसोटी सामन्यात उमेश यादव खेळण्याची संधी मिळालेली नव्हती. मागील वर्षीच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात उमेशच्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे त्याला या मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यांना मुकावे लागले होते. तसेच इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही त्याला सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
मात्र, असे असले तरी तो आणखी किमान दोन-तीन वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास उत्सुक आहे. मी आता ३३ वर्षांचा आहे. माझे शरीर मला आणखी दोन-तीन वर्षे साथ देईल असे वाटते. त्यामुळे मी तोपर्यंत निवृत्तीचा विचार करणार नाही. आता काही युवा वेगवान गोलंदाज पुढे येत आहेत आणि येत राहतील. मात्र, मी पूर्णपणे फिट असून भारतीय संघाच्या यशात योगदान देण्यास सज्ज आहे. असे उमेश यादव म्हणाला.
उमेश यादवला परदेशात जास्त सामने खेळायला मिळालेले नाहीत. याबाबत देखील त्याने सांगितले, मला परदेशात फारसे सामने खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्यामुळे वेगवान गोलंदाजीला अनुकूल खेळपट्ट्यांवर मी तितकीशी गोलंदाजी केलेली नाही. मात्र, मी आता पुरेसे कसोटी सामने खेळले असून कोणत्याही खेळपट्टीवर विकेट घेण्याचा मला विश्वास आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आरोग्य सुविधा उभ्या करू पण डॉक्टर नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचारी कुठून आणायचे ?
- खळबळजनक! पॉझिटिव्ह रुग्ण थेट अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या दालनात
- विश्वचषक जिंकल्यानंतर धोनीने का केले होते मुंडन ? संघ व्यवस्थापकाने दिले ‘हे’ उत्तर
- देशात कोरोनाचा विस्फोट; कालची आकडेवारी पाहून तुम्हीही लावाल डोक्याला हात
- ‘आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट चालू असताना कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यांची योजना आखू नये’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

