Share

दहावी-बारावीच्या विद्यार्थांना वेबसाइटवर मिळणार सराव प्रश्नसंच शिक्षण मंत्र्यांची माहिती

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने नेहमीच महत्त्वाच्या बाबी समोर येत आहे. येत्या एप्रिल-मे महिन्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार आहेत. याआधीच दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे २०२१ या कालावधीत होणार असून दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत होणार आहे.

त्यानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आणखी एक महत्त्वाची माहिती दिली आहे.  दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आता वेबसाईटवर सराव संच मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून प्रश्न संचाची लिंक शेअर केली आहे. या लिंकवरूनच विद्यार्थ्यांना दहावी, बारावीचा सराव संच उपलब्ध होणार आहे. https://maa.ac.in/index.php?tcf=prashnpedhi प्रश्नसंच साठी या लिंकवर क्लिक करा.

कोरोनामुळे यंदा विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रमच पूर्ण करावा लागणार असल्याने, या सरावसंचामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल असा विश्वास शिक्षण विभागानं व्यक्त केला आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा या ऑफलाईनच होणार आहेत. परीक्षा कशाप्रकारे घ्यायच्या याबाबत राज्य सरकारकडून तयारी सुरु असून यासाठी सरकारनकडून समिती नेमण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!