Share

टेनिसपटू सानिया मिर्झा करतीये अभिनयात पदार्पण झळकणार ‘या’ सीरिजमध्ये

Published On: 

मुंबई : भारताची प्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झा आता अभिनय क्षेत्रात पदार्पण करतेय. एका वेब सीरिजच्या माध्यमातून सानिया अभिनयात पदार्पण करणार आहे. ही सीरिज टीबी म्हणजेच क्षयरोगासंबंधित जनजागृती करणारी असेल. एकूण पाच एपिसोड्सच्या सीरिजची कथा असणार आहे. हि सिरीज लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर आधारित असणार आहे.

‘निषेध अलोन टुगेदर’ असं या सीरिजचं नाव असून सीरिजची कथा विकी आणि मेघा या जोडप्याच्या आयुष्याभोवती फिरते. यात विकीचं पात्र अभिनेता सयेद राझा अहमद, तर मेघाचं पात्र अभिनेत्री प्रिया चौहान साकारणार आहे. विकी आणि मेघा लॉकडाउनसारख्या कठीण काळात कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जातात, हे सानिया सांगेल.

‘निषेध अलोन टुगेदर’ २७ नोव्हेंबरपासून दर शुक्रवारी एमटीव्ही इंडिया आणि एमटीव्ही निषेध यांच्या युट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक हँडलवर उपलब्ध असणार आहे. या सिरिजद्वारे सानिया या सिरीज मधून डिजिटल विश्वात पदार्पण करणार आहे. या सिरीज नंतर सानिया बॉलीवूड मध्ये देखील पदार्पण करण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!