मुंबई : भारताचा माझी कर्णधार महेंद्र सिंग धोनी सध्या शेतीउद्योगात व्यस्त आहे. रांचीच्या भाजी बाजारामध्ये धोनीच्या शेतमालाला प्रचंड मागणी आहे. मटार आणि टॉम्याटोनंतर धोनीच्या शेतातील ऑरग्यानिक कॉलीफ्लॉवरला मोठी मागणी आहे. तीन वर्षपूर्वी धोनीने धुर्वा येथील सेम्बो फार्म मध्ये शेती आणि डेअरी व्यवसायाला सुरुवात केली आहे.
आता तेथे मोट्या प्रमाणात भाज्या आणि दुधाचे उत्पादन होते ईजा फार्म नावाच्या ब्रॅण्डने येथील उत्पादनाची विक्री होते. नुकतीच येथे टॉम्याटो आणि दुधाची विक्री सुरु झाली आहे. आता ऑरग्यानिक कॉलीफ्लॉवरला रांचीच्या बाजारात मागणी आहे. बर्मी कंपोस्ट आणि शेणखत वापरून या ऑरग्यानिक कॉलीफ्लॉवरच उतपादन घेण्यात आलं आहे.
मध्यंतरी धोनीचे शेती करतानाचे फोटो देखील व्हायरल झाले होते. त्याचप्रमाणे धोनीची टीम आता डेअरी क्षेत्रातही उतरली आहे. सहीवाल जातीच्या गाई धोनी टीमने विकत घेतल्या आहेत.
तसेच मत्सोद्योगात, बदक पालन आणि पोल्ट्री फार्ममध्ये देखील धोनीने गुंतवणूक केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर आता महेंद्रसिंह धोनी कडकनाथ कोंबड्यांची विक्री करेल. धोनीने मध्य प्रदेशातील झाबुआच्या कडकनाथच्या २ हजार पिल्लांसाठी अग्रिम मोबदल्यासोबत झाबुआच्या आदिवासी शेतकऱ्याला ऑर्डरही दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- घटस्फोट घेण्याच्या निर्णयानंतर IAS टीना डाबी यांनी शेअर आपल्या भावना
- खुशबू, उर्मिला मातोंडकर यांच्यानंतर आणखी एका दिग्गज अभिनेत्रीने सोडली कॉंग्रेसची साथ
- आता सरनाईक कुटुंबाने तयार राहावं! : किरीट सोमय्या
- भाजप हा शेतकऱ्यांचा पक्ष नसून शेतकऱ्यांच्या मालाची लूट करणारा पक्ष – नवाब मलिक
- शरद पवार राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडले, थोरातांचा शरद पवारांना टोला


