Share

लातूर महापालिकेच्या एका जागेसाठी नऊ उमदेवारांचे दहा अर्ज

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : लातूर महापालिकेच्या येथील प्रभाग 11 अ च्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नऊ उमदेवारांचे दहा अर्ज दाखल झाले आहेत. अर्जांची छाननी केली जाणार आहे.

येथील प्रभाग अकराचे भाजपचे नगरसेवक शिवकुमार गवळी यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. या जागेवर आता निवडणूक होत आहे. या एका जागेसाठी नऊ उमेदवारांचे दहा अर्ज दाखल झाले आहेत.

यात कॉंग्रेसच्या वतीने विकास वाघमारे, भारतीय जनता पक्षाच्या वतीने निखिल गायकवाड, भारिप बहुजन महासंघाच्या वतीने सुजाता अंजनीकर यांनी अर्ज दाखल केला आहे. तसेच बालाजी शिंदे, अजय सुरवसे, अमोल कांबळे, सचिन कांबळे, संजय ओहळ, प्रवीण कांबळे यांनही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मंगळवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी सुनील यादव हे काम पाहत आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!