मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले होते. राठोड वनमंत्री असताना शरीरसुखाची मागणी केल्याची तक्रार यवतमाळ पोलिसांकडे केली होती. या आरोपामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. परंतु आता याप्रकरणी पण, पोलीस तपासातून कोणतेही तथ्य समोर आले नाही. त्यामुळे पोलिसांनी संजय राठोड यांना क्लिन चीट दिली आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणावर मागील काही दिवसांपासून चांगलाच आवाज उठवला होता, तसेच त्यांनी याच मुद्द्यला धरून ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न देखील केला होता. दरम्यान आता पोलिसांनीच संजय राठोड यांना क्लिन चीट दिल्यामुळे या सर्व आरोपातून ते मुक्त झाले आहेत. यावर आता चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.
‘महिलेने केलेल्या आरोपांनंतर त्या प्रकरणी राज्य सरकारने एसआयटी नेमली होती. त्यानंतर काही काळातच त्या महिलेवर आणि तिच्या कुटुंबावर अनेकांकडून दबाव टाकला गेला असल्याची माहिती मिळाली. महिलेला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले असता त्या महिलेची मनस्थिती ठीक नसल्याचे सांगण्यात आले होते. मग १४ तारखेला पोलिसांनी तिची मनस्थिती ठीक आहे असे सांगून तिचे बयान नोंदवले. त्यात तिने सांगितले कि माझ नाव वापरून कोणीतरी खोडसाळपणा केला आहे.
खरतर संजय राठोड यांच्या केसेस मध्ये कशाप्रकारे ते निरपराध आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न हा सातत्याने होत आहे. संजय राठोड ने शरीरसुखाची मागणी केल्याचं पत्र जर खोडसाळपणा असेल तर तो कुणी व का केला हे यवतमाळ पोलिसांनी शोधून काढावे. नेमकं संजय राठोडच्याचं केसमध्ये ते निरपराध कशा पद्धतीत आहेत हे सांगायचा याआधी ही प्रयत्न झालाय व आता ही अगदी तेच आश्चर्य वाटण्यासारखं काहीचं नाही.’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सतीश चव्हाण यांच्या मुलाच्या साखरपुड्याला धनंजय मुंडेंची पत्नीसह हजेरी
- ‘गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा’ ; खासदार संभाजीराजे आक्रमक
- खासदार नवनीत राणांवर मानहानीचा दावा ठोकणार, यशोमती ठाकूर यांचा इशारा
- राज ठाकरेंचा राष्ट्रवादीवर जातीयवादाचा आरोप; खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या..
- पोलिसांना दिलेले चॅलेंज अंगलट! बैलगाडी शर्यत प्रकरणी पडळकरांसह ४१ कार्यकर्त्यांवर गुन्हा


