नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा मधल्या फळीतील फलंदाज टेम्बा बवुमा(Temba Bavuma) याने भारताविरुद्धच्या पहिल्या डावात संघाच्या खराब कामगिरीवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. सरावाच्या अभावामुळे पहिल्या डावात संघाची फलंदाजी फ्लॉप झाली आणि त्यांना मोठी धावसंख्या करता आली नाही, असे त्याने म्हटले आहे.
गेल्या 12 महिन्यांत दक्षिण आफ्रिकेचा संघ सहावा कसोटी सामना खेळत होता. मात्र, भारतीय गोलंदाजांसमोर संघाची फलंदाजी टिकू शकली नाही आणि संपूर्ण डाव अवघ्या 197 धावांत आटोपला. भारताने पहिल्या डावात 327 धावा केल्या होत्या.
दक्षिण आफ्रिकेकडून फक्त टेम्बा बवुमाने भारतीय गोलंदाजांचा सामना केला. त्याने सर्वाधिक 52 धावा केल्या आणि डी कॉकने 34 धावांची खेळी केली. याशिवाय खालच्या फळीत कागिसो रबाडाने 25 धावांचे योगदान दिले. टेम्बा बवुमाने कबूल केले की संघाच्या फलंदाजांना सामन्याच्या सरावाचा अभाव होता आणि त्यामुळे त्यांना चांगली फलंदाजी करता आली नाही.
एक वृत्तसंस्थेसी बोलतानाटेम्बा बवुमा म्हणाला “मॅच सरावाच्या कमतरतेमुळे त्रास झाला आहे. नेटमध्ये कितीही सराव केला तरी मॅच सराव हा सामना होऊ शकत नाही. या सामन्यात आम्हाला आमची पातळी सुधारायची आहे.”
टेम्बा बवुमाने मोहम्मद शमीचेही कौतुक केले तो म्हणाला, “शमी हा जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे. आम्ही त्याला जगभर विकेट घेताना पाहिले आहे. त्यामुळे त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. एक फलंदाज म्हणून आम्हाला आमचा बचाव मजबूत करायचा आहे.”
महत्त्वाच्या बातम्या
- तुमचं पत्र बदनामी करणारं; मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर राज्यपाल कडाडले
- “अधिवेशनात सर्वात प्रभावी नेता, लोक म्हणतात फक्त दादा”, रुपाली पाटलांनी केले अजित पवारांचे कौतुक
- क्विंटन डी कॉक खेळणार नाही पुढील दोन कसोटी सामने; ‘हे’ आहे कारण
- …नाहीतर उपमुख्यमंत्री असे तोंडावर आपटले नसते; मनसेचा टोला
- ऋषभ पंतने मोडला महेंद्रसिंग धोनीचा ‘हा’ मोठा विक्रम


