Share

सोशल डिस्टंसिंगला पायदळी तुडवत गाव केले सॅनिटाईज

Published On: 

औरंगाबाद :कोरोणा हा संसर्गजन्य आजार दिवसेंदिवस वाढतच असुन शहरापाठोपाठ आता ग्रामीण भागातही कोरोणाने शिरकाव करण्यास सुरुवात केलेली आहे. शहरात व ग्रामीण भागात कोरोणा रूग्णसंख्येला आळा बसावा व रूग्णाची संख्या नियंञणात रहावी यासाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. प्रशासनाला सहकार्य म्हणून तसेच नागरिकांच्या हितासाठी सिल्लोड तालुक्यातील मोढा बु येथे गावात सैनिटायजर फवारणी करण्यात आली खरी. मात्र हे करत असताना तेच सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याचे विसरले.

सुरुवातीला फक्त शहरातच कोरोनाने ठाण मांडले होते. परंतु आता कोरोनाने ग्रामीण भागातही शिरकाव केला आहे. शासनासह प्रशासन देखील कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी दिवसरात्र एक करत प्रयत्न करत आहेत. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात फिरून जनजागृती करत आहे. नियम न पाळणाऱ्याना दंड देखील आकारण्यात येत आहे.

त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी देखील आपली जबाबदारी घेत कोरोनाचे नियम पाळण्यास सुरुवात केली आहे. सर्व नागरिकांनी व व्यावसायिकांनी शासनाने कोरोणासंदर्भात दिलेल्या नियमांचे पालन करून नियमित मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे आदी नियम पाळून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन अखिल भारतीय किसान सभेचे तालुका अध्यक्ष बाळु पाटील शिंदे यांनी केले. मात्र आवाहन करताना स्वतः ते आणि कार्यक्रते सोशल डिस्टंसिंग आणि मास्क लावण्याचे विसरले असल्याचे चित्र दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!