Share

‘बिहारच्या निवडणुकीच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच तेजस्वी यादव हेच आहेत’

Published On: 

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. 243 जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये मतदार पार पडल्यानंतर आज मतमोजणी होणार आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यासह 3733 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. कोरोना काळातील ही सर्वात मोठी निवडणूक आहे. राज्यात मतमोजणीसाठी 38 जिल्ह्यांमध्ये 55 मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.

नितीश कुमार पुन्हा सत्तेत येणार की तेजस्वी यादव विजय मिळवणार हे आज स्पष्ट होईल. बिहार विधानसभा निवडणुकीत सुरुवातीच्या कलांनुसार भाजप-जेडीयू यांच्या युतीने आघाडी घेतली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत तेजस्वी यादव यांचा करिष्मा चालणार असून महागठबंधनला स्पष्ट बहुमत मिळेल असा दावा सर्वच माध्यमांनी एक्झिट पोलद्वारे केला होता. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या दोन तासांमधील चित्र जवळपास तसेच होते. मात्र १० वाजेनंतर आता दुपारी १२.३० वाजेपर्यंत एनडीए अर्थात नितीश कुमार यांनी आघाडी कायम ठेवली आहे.

दरम्यान,बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरूवात झाली. सुरुवातीच्या तासाभरात महाआघाडीनं जोरदार मुसंडी मारली. मात्र, हे कल हळूहळू बदल गेले. दुपारी तीनपर्यंत एनडीएने महाआघाडीला पिछाडीवर टाकत आघाडी घेतली. यात ७३ ठिकाणी भाजपा आघाडीवर आहे. तर जदयू ४९, व्हीआयपी ५ व हम एका जागेवर आघाडीवर आहे.

दुसरीकडे महाआघाडी सध्या १०५ जागांवर आघाडी आहे. राजदचे ६७ उमेदवार आघाडीवर आहेत. काँग्रेसने २०, तर डाव्यांनी १८ जागांवर आघाडी घेतली आहे. बसपा आणि एमआयएमचे प्रत्येकी दोन उमेदवार आघाडीवर आहेत. बहुमतांसाठी १२२ जागांची आवश्यकता असून, एनडीएला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. मात्र, अंतिम निकालानंतर हेच चित्र कायम राहणार का हा प्रश्न आहे.

दरम्यान, हे कल समोर येवू लागल्यानंतर आता  शिवसेनेने प्रतिक्रिया दिली आहे. खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य केले. बिहारच्या निवडणुकीच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच तेजस्वी यादव हेच आहेत असा दावा त्यांनी केला.निवडणुकीत त्यांनी ज्या पद्धतीने त्यांनी मेहनत घेतली त्याचे कौतुक व्हायलाच पाहिजे असं देखील ते म्हणाले.एक तरुण तडफदार नेता बिहारला मिळाला असल्याचा दावा देखील त्यांनी केला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!