Share

मराठा समाजाने सामंजस्याची भूमिका घ्यावी – आरोग्यमंत्री राजेश टोपे

Published On: 

जालना : मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सरकार भक्कमपणे न्यायालयात बाजू मांडत आहे. त्यामुळे समाजाने सामंजस्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव येथे मागच्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. आरक्षण मिळावे या मागणीसाठी २० जानेवारीपासून उपोषण, ठिय्या आंदोलन आणि आता चक्री उपोषण सुरू झाले आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने धरणे आंदोलन केले. या आंदोलनाला टोपे यांनी भेट दिली. दरम्यान आंदोलनकर्त्यांना, सध्या हे प्रकरण न्यायालयामध्ये आहे. त्यामुळे समाजाने सामंजस्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन केले.

अशोक चव्हाण यांना साष्ट पिंपळगावला आणतो…

मंंत्री टोपे म्हणाले की, मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याशी यापूर्वी बोललो आहे. अजूनही त्यांच्यासोबत बोलून त्यांना साष्ट पिंपळगाव येथे सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांशी बोलण्यासाठी आपण घेऊन येऊ, असे आश्वासनही मंत्री राजेश टोपे यांनी दिले. त्याचसोबत मराठा समाजाला आरक्षण हे ओबीसी किंवा इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता घ्यायचे आहे. त्यासाठी न्यायालयात योग्य बाजू मांडणे सुरू आहे, असे सांगून पंजाबराव देशमुख वसतिगृहाच्या योजनेला गती देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. दरम्यान, आण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना थेट कर्ज मिळावे, यासाठी प्रयत्न करत आहे. सध्या हे कर्ज बँकेमार्फत मिळत आहे. याचा फायदा देखील मराठा समाजाने मोठ्या प्रमाणात घ्यावा, असे आवाहनही आरोग्य मंत्री यांनी या वेळी केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!