नवी दिल्ली : न्यूझीलंड आणि नंतर इंग्लंडने पाकिस्तान दौरा रद्द केल्यानंतर संपूर्ण पाकिस्तान संतापलेले दिसत आहेत. याच दरम्यान ऑस्ट्रेलिया संघाकडून खेळणारा उस्मान ख्वाजा याने सुद्धा या गोष्टींवर नाराजी दर्शवली आहे. माघार घेणारे संघ भारतात अशी परिस्तिथी असती तरी खेळले असते असा आरोपही त्याने केला आहे.
ऑस्ट्रेलिया संघाकडून खेळणारा उस्मान ख्वाजा मूळचा पाकिस्तानचा आहे. त्याचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला होता. सुरक्षेच्या कारणास्तव न्यूझीलंड आणि इंग्लंडने दौरा रद्द केल्यावर त्याने यावर भाष्य केले. “क्रिकेट मंडळ आणि खेळाडूंना दौऱ्यातून माघार घेणे सोपे वाटले. मात्र अशीच परिस्तिथी भारतात असती तर त्यांनी खेळण्यास नकार दिला नसता. हा सगळं केवळ पैशाचा खेळ आहे. पाकिस्तानमध्ये याआधीही अनेक स्पर्धा झाल्या आहेत. त्यामुळे तिथे खेळणे सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आहे. अशा शब्दात त्याने माघार घेणाऱ्या संघावर निशाणा साधला आहे.
न्यूझीलंड आणि इंग्लंडने एकाच आठवड्यात दौरा रद्द केल्याने पाकिस्तान किर्केट बोर्डाला धक्का बसला होता. यानंतर बोर्ड, चाहते आणि खेळाडू या सगळ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. आता मात्र मूळ पाकचा असलेला उस्मान ख्वाजाच्या पाकला समर्थनार्थ या वक्तव्यावर ऑस्ट्रेलिया बोर्ड काय प्रतिक्रिया देईल याकडेसगळ्यांचे लक्ष आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यात घटना घडल्यावर अन्य राज्यांकडे बोट दाखविणे, ही असंवेदनशीलता : देवेंद्र फडणवीस
- कमालच ! सिंधुदुर्ग विमानतळ सुरु होण्याआधीच ‘या’ तारखेपर्यंतच तिकीट फुल्ल
- ‘त्या’ रस्त्यावर १७० किमी स्पीडच्या गाडीत बसलो होतो पण पोटातलं पाणीसुद्धा हललं नाही – गडकरी
- ‘काँग्रेस विचारांवर प्रगाढ श्रद्धा आणि निष्ठा असणारे नेतृत्व गमावले’
- खामोश.. म्हणणाऱ्या ‘शत्रुघ्न’ यांना आज ही आठवतेय लग्नाची अनोखी कहानी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
