🕒 1 min read
मुंबई : आयपीएलच्या आगामी पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव हा १८ फेब्रुवारीला होणार आहे. या बोली प्रक्रियेआधी सर्व फ्रँचायजीने आपल्या ताफ्यातील रिलीज आणि रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक संघांनी मोठ्या आणि अनुभवी खेळाडूंना रिलीज केलं आहे. यामुळे इतर फ्रँचायजींमध्ये या खेळाडूंना खरेदी करण्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.
त्यातच आता आयपीएल फ्रँचायझींनी त्यांच्या संघानुसार आणि प्रोफाइलला सर्वोत्कृष्ट ठरवणाऱ्या खेळाडूंचा शोध सुरू केला आहे आणि अधिकाऱ्यांनी लिलावासाठी नोंदणी केलेल्या एकूण खेळाडूंची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेच्या नायक चेतेश्वर पुजारानेही लिलावासाठी स्वत:ची नोंदणी केली आहे. भारताचा स्टार कसोटी फलंदाज 50 लाखांच्या बेस प्राइसवर उपलब्ध असेल. सॉलिड मिडल ऑर्डर फलंदाजाची शोधात असणारी कोणतीही टीम चेतेश्वरवर लक्ष ठेवून असेल.
पुजाराने अखेर 2014 मध्ये इंडियन प्रीमियर लीग खेळली होती. पुजाराकडे आयपीएलमधील 30 सामन्यांचा अनुभव आहे. ऑस्ट्रेलिया दौर्यावरील भारताला ऐतिहासिक मालिका विजय मिळवून देण्यात पुजाराचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. मात्र, यंदा फ्रॅन्चायजी त्याच्यावर दाव लावते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : राज ठाकरे यांना जामीन मंजूर !
- ‘जो पर्यंत मोदी- शहांच समर्थन तो पर्यंत मी मुख्यमंत्री’
- ‘ड्रग्ज अॅडिक्टला झाशीची राणी बोलवताना लाज वाटली नव्हती का?’
- दानशूर कर्णाची उपमा देणे योग्य राहील असं कुणी विचारलं तर त्याचे उत्तर असेल फक्त रतन टाटा
- दावा तर मुख्यमंत्री पदावर देखील करता येऊ शकतो, भुजबळांचा कॉंग्रेसला अप्रत्यक्ष टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
