मुंबई : जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी केवळ एक दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. सगळीकडे या सामन्याची उत्सुकता लागली आहे. या सामन्यासाठी भारत आणि न्युझीलंड दोन्ही संघ साउथहॅमप्टटनमध्ये पोहोचले आहे.
साउथहॅम्पटनच्या या मैदानावर भारतीय संघाने यापुर्वी २ कसोटी सामने खेळलेले आहे. आणि दुर्दैवाने त्या दोन्ही सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला होता. यातील पहिला सामना २०१४ मध्ये खेळला होता. या सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात ५६९ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात ३३० धावा केल्या होत्या. इंग्लंडने दुसऱ्या डावात २०५ वर डाव घोषीत करत भारताना ४४५ धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र भारताचा दुसरा डाव केवळ १७८ धावांवर संपुष्टात आला.
तर दुसरा सामना २०१८ मध्ये झाला होता. या सामन्यात भारताने इंग्लंडचा पहिला डाव २४६ धावांवर अटोपला होता. मात्र भारतीय संघाने पहिल्या डावात केवळ २७३ धावा केल्या. यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात जोरदार मुसंडी मारत २७१ धावांची मजल मारली होती. चोथ्या डावात भारतीय संघासमोर २४५ धावांचे लक्ष्य होते पण भारतीय संघ चौथ्या डावात केवळ १८४ धावा जोडु शकला आणि बाद झाला. तर न्युझीलंडने या मैदानावर तीन एकदिवसीय सामने खेळलेले आहे. यातील एक अनिर्णीत तर दोन सामन्यात विजय मिळवला आहे. डब्ल्युटीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोणता संघ इतिहास घडवतो हे काही दिवसात कळेलच.
महत्वाच्या बातम्या
- ‘अशोक चव्हाणांनी जनहिताचे कामे करावीत’, खा.चिखलीकरांचा टोला
- ‘आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार’, चंद्रकांत खैरेंची माहिती
- ‘झारीतील शुक्राचार्य नेमके कोण? मराठा समाजाच्या मागण्या का मान्य होत नाहीत?’
- ‘गहिनीनाथ गडाच्या पायी वारीला परवानगी द्या’, पंकजा मुंडेंचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र
- ‘..तर महिनाभरात तिसरी लाट येणार’, मुख्यमंत्री ठाकरेंचा इशारा

