Share

कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ पुन्हा राहुल गांधी यांच्याच गळ्यात पडण्याची चिन्हे

Published On: 

नवी दिल्ली – काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकत्याच माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार,राहुल गांधी यांच्याकडेच पक्षाचे अध्यक्षपद देण्याचं जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे.

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची बैठक सुरू असून या बैठकीत राहुल गांधी यांच्याकडेच काँग्रेसचे अध्यक्षपद देण्याची मागणी काँग्रेसच्या काही नेत्यांनी लावून धरल्याने त्यावरच या बैठकीत प्रामुख्याने चर्चा सुरू असून राहुल यांच्याकडेच पक्षाची सूत्रे देण्यावर जवळपास एकमत झाल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान, कॉंग्रेसचे जेष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांनी या सर्व मुद्द्यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, अध्यक्ष पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया आम्ही लवकरच सुरु करणार आहोत. माझ्यासहित पक्षातील ९९.९ टक्के लोकांना राहुल गांधी हे अध्यक्ष व्हावेत असे वाटते परंतु शेवटी निर्णय राहुल गांधी यांनाच घायचा आहे असं ते म्हणाले.एनडीटीव्ही ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

दरम्यान, काँग्रेस पक्ष आणि लोकशाहीला वाचवण्यासाठी सोनिया गांधी यांना पुत्र मोह सोडावा लागेल, असे वक्तव्य राष्ट्रीय जनता दलाचे नेते शिवानंद तिवारी यांनी केले आहे. सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपदाच्या खुर्चीचा मोह टाळून काँग्रेस पक्षाला वाचवले होते. मात्र, आज त्याहूनही जास्त महत्त्वाची वेळ असून सोनिया गांधी यांनी पुत्र मोह बाजुला सारून लोकशाही व्यवस्था वाचवण्यासाठी पावले उचलली पाहिजेत, असे तिवारी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

राहुल गांधी हे उदासीन नेते आहेत. ते स्वत:च्या पक्षातील लोकांना प्रोत्साहित करू शकत नाहीत मग जनतेची गोष्ट तर सोडाच. त्यांच्या पक्षातील लोकांचाच त्यांच्यावर विश्वास नाही. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी काँग्रेस पक्ष तोंडघशी पडत असल्याचे शिवानंद तिवारी यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!