मुंबई : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या पथकाने आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सोबत मुंबईतल्या धारावी भागाला भेट दिली. याठिकाणी असलेला ट्रांझिट कॅम्प, क्वारंटाईन सुविधेची पाहणी त्यांनी केली. विलगीकरणाची सुविधा बाराशे खाटांवरून दोन हजार खाटांपर्यंत वाढवण्याची सूचना या पथकानं केल्याची माहिती टोपे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.
राज्यातील दोन शहरं मुंबई आणि पुणे ही कोरोना व्हायरसची हॉटस्पॉट बनली आहेत. दोन्ही शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून हा सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे. नाबाधित रुग्णांची संख्या पाच हजारच्या पुढे गेली आहे. मंगळवारी (21 एप्रिल) दिवसभरात राज्यात 552 नवे कोरोना पॉझिटिव्हि रुग्ण आढळले आहेत.
दरम्यान,एका दिवसात 19 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 5218 वर पोहोचला आहे. दिलासादायक बाब म्हणजे एकूण 722 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कल एकूण 150 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

